काय आहे पॉक्सो कायदा?

काय आहे पॉक्सो कायदा?

संयुक्त राष्टसंघाने देखील आरोपींना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी केली आहे. पण अशाप्रकारच्या गुन्ह्यांसाठी कठोर शिक्षेचं प्रावधान करण्यात आलं आहे.

  • Share this:

16 एप्रिल:   जम्मू काश्मिरमध्ये अल्पवयीन मुलीवर झालेल्या बलात्कार आणि हत्येमुळे सगळा देशच हादरून गेला आहे. संयुक्त राष्टसंघाने देखील  आरोपींना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी केली आहे. पण अशाप्रकारच्या गुन्ह्यांसाठी कठोर शिक्षेचं प्रावधान करण्यात आलं आहे.

लहान मुलांवर होणारे लैंंगिक अत्याचार थांबवण्यासाठी हा कायदा पास करण्यात आला. या कायद्यानुसार फक्त अत्याचार करणाराच नाही तर ज्याला अत्याचाराची माहिती असूनही तक्रार दाखल करत नाही तोही आरोपी आहे.  मुलावर अत्याचार करणे ,बलात्कार करणे यासोबत  त्याची अश्लील चित्रफीत बनवणे हादेखील गुन्ह्यास पात्र आहे.

काय आहे पॉक्सो कायदा?

-लहान मुलांवर होणारं लैंगिक शोषणापासून संरक्षण करण्यासाठी 2012 साली हा कायदा पास करण्यात आला.

-या खटल्याची सुनावणी विशेष न्यायालयात. ती 1 वर्षात संपवणं बंधनकारक

- कमीतकमी 10 वर्ष तर जास्तीजास्त जन्मठेपेची शिक्षा

- लहान मुलाच्या लैंगिक शोषणाची चित्रफीत बनवल्यास त्यासाठी वेगळ्या शिक्षेची तरतूद

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 16, 2018 06:19 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading