नागरिकत्व सुधारणा विधेयक अर्थात Citizenship Amendment Bill लोकसभेत सोमवारी मंजूर झालं. आता ते राज्यसभेत सादर होईल. या विधेयकावर भरपूर चर्चा सुरू आहे. सध्याच्या कायद्यात नेमके कोणते बदल होणार आहेत? कुणाला नागरिकत्व मिळेल आणि कुणाचं धोक्यात येईल? याविषयी आपली माहिती तपासून पाहा… ही एक छोटीशी क्विझ घेऊन. या वादग्रस्त विधेयकाविषयी तुम्हाला किती माहिती आहे यासाठी सोडवून पाहा ही प्रश्नमंजुषा आणि शेअर करा तुमचा स्कोअर
Citizenship Amendment Bill Quiz सोडवून पाहा
नागरिकत्व सुधारणा विधेयक (CAB) सोमवारी लोकसभेत संमत झालं. या वादग्रस्त विधेयकाबद्दल तुम्हाला किती माहिती आहे... तपासून पाहा. सोडवून पाहा ही क्वीझCAB म्हणजेच नागरिकत्व सुधारणा कायद्यानुसार तिबेटी निर्वासितांना नागरिकत्व मिळू शकतं का?
या कायद्यानुसार पाकिस्तानमधून भारतात आलेल्या अहमदिया पंथाच्या व्यक्तींना नागरिकत्व मिळू शकतं का?
बांग्लादेशमधल्या एखाद्या हिंदू व्यक्तीने 2015 मध्ये भारतात बेकायदेशीररित्या प्रवेश केला असेल तर तिला CAB (Citizenship Amendment Bill) अंतर्गत नागरिकत्व मिळू शकतं का?
एखाद्या बौद्ध व्यक्तीने बांग्लादेशमधून भारतात बेकायदा स्थलांतर केलं असेल आणि तिचं नाव आसाममधल्या नॅशनल रजिस्टर ऑफ सिटीझन्स मध्ये नसेल. त्याचबरोबर फॉरिनर्स ट्रिब्युनलमध्ये त्या व्यक्तीच्या विरुद्ध खटला प्रलंबित असेल तरीही ती व्यक्ती नागरिकत्वासाठी अर्ज करू शकते का ?
मेघालयाचा समावेश भारतीय राज्यघटनेच्या सहाव्या शेड्युलमध्ये केला आहे. हे CAB च्या कक्षेबाहेर आहे. मग बांग्लादेशमधून एखाद्या हिंदू व्यक्तीने भारतात स्थलांतर केलं असेल आणि ती व्यक्ती मेघालयमध्ये शिलाँगच्या पोलिस बाजारमध्ये राहत असेल तर ती व्यक्ती नागरिकत्वासाठी अर्ज करू शकते का ?
पाकिस्तानमधून आलेली एखादी बेकायदेशीर ख्रिश्चन स्थलांतरित व्यक्ती जर नागालँडमधल्या दिमापूरमध्ये राहत असेल तर ती व्यक्ती नागरिकत्वासाठी अर्ज करू शकत नाही का? कारण नागालँड हे इनर लाइन परमिटने संरक्षित आहे आणि ते CAB च्या कक्षेबाहेर आहे.
त्रिपुरामध्ये बेकायदेशीररित्या स्थायिक झालेली एखादी बंगाली हिंदू व्यक्ती असेल तर तिला CAB अंतर्गत नागरिकत्व मिळू शकतं का?
पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांग्लादेश या देशांतून धार्मिक छळामुळे ज्या हिंदू, शीख, बौद्ध, जैन, पारशी आणि ख्रिश्चन व्यक्तींनी भारतात स्थलांतर केलं आहे त्यांना CAB नुसार आपोआप नागरिकत्व मिळेल का?
भारतात आलेल्या कोणत्याही हिंदू स्थलांतरिताला CAB च्या अंतर्गत नागरिक्तव मिळू शकतं का?
बांग्लादेशातून येऊन अरुणाचल प्रदेशमध्ये स्थायिक झालेल्या चकमा आणि हॅजाँग निर्वासितांना अजून नागरिकत्व मिळालेलं नाही. असे लोक CAB अंतर्गत नागरिकत्वासाठी अर्ज करू शकतात का ?
श्रीलंकेतून भारतात आलेले हिंदू तामिळ लोक CAB अंतर्गत नागरिकत्वासाठी अर्ज करू शकतात का?
जी मूळ जोरहाटची आहे आणि ती आसामी बोलणारी हिंदू व्यक्ती आहे अशा व्यक्तीचं नाव नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझन्समध्ये घेतलेलं नव्हतं. आता ती व्यक्ती CAB अंतर्गत अर्ज करू शकते का?
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.