Home /News /national /

पतंजलीने CORONIL लाँच केल्यानंतर काय काय झालं? 24 तासांतील 10 मोठे अपडेट्स

पतंजलीने CORONIL लाँच केल्यानंतर काय काय झालं? 24 तासांतील 10 मोठे अपडेट्स

कोरोनिल (Coronil) लाँच केल्यानंतर पतंजलीला (Patanjali) धक्क्यांवर धक्के मिळत आहेत.

    नवी दिल्ली, 24 जून : संपूर्ण जगातील शास्त्रज्ञ कोरोनाव्हायरसविरोधात औषध आणि लस शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. इतर आजारांवर उपलब्ध असलेल्या औषधांनी कोरोनावर उपचार केले जात आहेत. अशात पतंजलीने (patanjali) मात्र कोरोनाविरोधात औषध शोधल्याचा दावा केला आणि मोठ्या दिमाखात कोरोनिल (coronil) हे औषध लाँच केलं. या औषधामुळे 100 टक्के कोरोना रुग्ण बरा होत असल्याचा दावा योगगुरू रामदेव बाबा यांनी केला. मात्र हे औषध लाँच झाल्याचा काही तासांतच वादाच्या भोवऱ्यात सापडलं आहे. कोरोनिल औषधामुळे पतंजलीच्या समस्या वाढल्या आहेत. कोरोनावर हे औषध प्रभावी ठरत असल्याचा हा दावा जो पतंजलीने केला आहे तो सरकार आणि प्रशासनाने खोडून काढला आहे. मंगळवारी बाबा रामदेव यांनी कोरोनिल हे औषध लाँच केलं. दिव्य कोरोना किट आणलं. जे जगाला शक्य झालं नाही ते बाबा रामदेव यांनी करून दाखवलं. विशेष म्हणजे कोरोनाच्या औषधाच्या आशेवर असणाऱ्या त्याची प्रतीक्षा करणाऱ्या प्रत्येकासाठी ही आनंदाची बातमी होती. मात्र काही तासांतच कोरोनिल औषधावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले. हे वाचा - राज्याकडूनही पतंजलीला दणका; Coronil ला दिला खोकला-तापाच्या औषधाचा परवाना 1) केंद्र सरकारने पतंजलीला नोटीस बजावली. या औषधाबाबत आपल्याला माहिती नसल्याचं म्हणत याबाबत आधी सविस्तर माहिती द्या अशा सूचना आयुष मंत्रालयाने पतंजलीला दिल्या. 2) पूर्ण पडताळणी होईपर्यंत कोरोनिलची जाहिरात थांबवावी, असे आदेश देत केंद्रीय आयुष मंत्रालयाने पतंजलीला दणका दिला. 3) केंद्र सरकारनंतर उत्तराखंड सरकारनेही पतंजलीला नोटीस बजावली. उत्तराखंड सरकारने पतंजलीला खोकला-तापाच्या औषधासाठी परवाना दिल्याचं स्पष्ट केलं. पतंजलीने केलेल्या अर्जामध्ये कोरोनाव्हायरसचा उल्लेख नव्हता असं सांगितलं. पतंजलीला कोरोना किटसाठी परवानगी कशी मिळाली, याचे उत्तर देण्याचे आदेश राज्य सरकारने दिले. 4) पतंजलीने या औषधाचं जयपूरच्या निम्समध्ये ट्रायल केल्याचं सांगितलं. मात्र निम्समध्ये कोरोनाच्या औषधाच्या ट्रायलसाठी मंजुरी दिली नव्हती असं राजस्थानच्या आरोग्य मंत्र्यांनी सांगितलं. 5) जयपूरमधील डॉक्टर संजीव गुप्ता यांनी बाबा रामदेव यांच्याविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. कोरोनाच्या औषधाचा दावा करून बाबा रामदेव यांनी त्यांची दिशाभूल केली असा गुप्ता यांनी तक्रारीत आरोप केला आहे. तसंच, आयसीएमआरच्या परवानगीशिवाय औषध कसे सुरू करण्यात आले? असा सवालही उपस्थितीत करण्यात आला. हे वाचा - अरे देवा! हळद आणि च्यवनप्राश फ्लेव्हर Ice Cream; आता हेच बाकी राहिलं होतं 6) राजस्थान सरकारनेही कोरोनिलबाबतचा पतंजलीचा दावा खोटा असल्याचं सांगितलं. 7) बाबा रामदेव यांनी आपल्या कोरोनासंबंधी औषधाबाबत ट्विट केलं. ज्यामध्ये त्यांनी आयुर्वेदाचा विरोध करणाऱ्यांसाछी निराशाजनक बातमी आहे, असं म्हटलं. 8) या ट्वीटसोबतच आचार्य बालकृष्ण यांनी आपलं एक ट्वीट जोडलं आहे. ज्यामध्ये त्यांनी आयुष मंत्रालयाने पतंजलीच्या औषधाचे क्लिनिक ट्रायलसंबंधी दस्तावेज मिळाल्याचं सांगितलं. 9) केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक यांनी सांगितलं, पतंजलीने कोरोनिल औषधाबाबत आपला रिपोर्ट आयुष मंत्रालयाला पाठवला आहे, ज्यामार्फत त्यांनी दावा केला आहे की कोरोना सात दिवसांत बरा होतो. 10) आयुष मंत्रालय आता या रिपोर्टची पडताळणी करेल आणि त्यानंतर औषधाला परवानगी देण्याबाबत निर्णय घेईल. संपादन - प्रिया लाड
    First published:

    Tags: Coronavirus, Patanjali

    पुढील बातम्या