मराठी बातम्या /बातम्या /देश /युक्रेनहून भारतीयांना आणणाऱ्या विमानात 'जय श्री राम'चे नारे; Video होतोय व्हायरल

युक्रेनहून भारतीयांना आणणाऱ्या विमानात 'जय श्री राम'चे नारे; Video होतोय व्हायरल

विमानात नेमकं काय घडलं?

विमानात नेमकं काय घडलं?

विमानात नेमकं काय घडलं?

नवी दिल्ली, 2 मार्च : Russia-Ukraine News : यूक्रेनवर रशियाने केलेल्या हल्ल्यानंतर युक्रेनमधील परिस्थिती चिंताजनक झाली आहे. त्यातही येथे अडकलेल्या भारतीयांमुळे चिंता अधिक वाढली आहे. आतापर्यंत अनेक भारतीयांना युक्रेनहून बाहेर काढण्यात आलं आहे. ते विशेष विमानाने (Special Flight for Evacuation) भारतात परतले आहेत. अशीच एक फ्लाइट टेक ऑफ करण्यापूर्वी पायलट असं काही म्हणाला की, ऐकून प्रवासी भावुक झाले.

ही घटना स्पाइसजेटच्या विमानात घडली. यावेळी पायलट सर्व प्रवाशांचं स्वागत करण्यासाठी अनाऊन्समेंट करीत होता. हे उड्डाण बुडापेस्टहून नवी दिल्लीच्या दिशेने सुरू होणार होतं. विमान भारतीय प्रवाशांनी खचाखच भरलं होतं. हा व्हिडीओ स्पाइसजेटच्या  (SpiceJet) ऑफिशियल ट्विटर हँडलवरुन (Twitter) शेयर करण्यात आला आहे.

पायलट म्हणाला, आता मातृभूमीकडे परतण्याची वेळ..

व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये पायलट विमानातील सर्व भारतीयांचं स्वागत करताना दिसत आहे. तुम्ही सर्वजणं सुरक्षित असल्याचा आनंद आहे. आणि तुमचं धाडस पाहून आम्हाला अभिमान वाटतो. इतक्या कठीण परिस्थितीतून तुम्ही सर्वजणं बाहेर आलात आणि आता आपल्या घराच्या दिशेने प्रवास करीत आहात. तुम्ही आराम करा आणि कुटुंबाला भेटण्यासाठी प्रतीक्षा करा. पायलटने जय हिंद म्हणून आपलं म्हणणं पूर्ण केलं. यानंतर संपूर्ण विमानात टाळ्यांचा आवाज झाला. प्रवाशांनी देशभक्तीच्या घोषणा दिल्या. काहींनी तर जय श्री रामच्याही घोषणा दिल्या.

First published:
top videos

    Tags: Russia Ukraine, Spicejet