
कोरोना व्हायरसपासून बचाव करण्यासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांना सध्या सक्तीनं N-95 मास्क वापरण्याची गरज आहे. जाणून घ्या काय आहेत या N-95 मास्कची विशेष वैशिष्ट्य…

या मास्कची प्रमुख वैशिष्ट्य हे आहे की हा हवेतील 95% दूषित कणांपासून आपलं संरक्षण करतो. सर्जिकल मास्कपेक्षा हा मास्क जास्त प्रभावी असतो.

N-95 मास्कमध्ये एकूण पाच लेअर (स्तर) असतात. यात न चिकटणारा कपडा आणि फिल्टर कपडा यांचेही अनेक लेअर वापरलेले असतात.

N-95 चं एक वैशिष्ट्य हे सुद्धा आहे की हा लिकेज होत नाही. म्हणजे तुम्ही जेव्हा श्वास घेता त्यावेळी याच्या कोणत्याही कोपऱ्यातून हवा आता प्रवेश करु शकत नाही. ज्यामुळे 95% दूषित कणांपासून तुमचं संरक्षण होतं.

आरोग्य कर्मचारी म्हणजेच डॉक्टर्स, नर्स इत्यादींना या मास्कची अत्यावश्यकता आहे. कारण ते सतत संक्रमित रुग्णांच्या संपर्कात असतात.

मेडिकल प्रक्रियेदरम्यान आरोग्य कर्माचाऱ्यांचा रुग्णांशी सर्वाधिक संपर्क येतो. त्यामुळे इतर कोणत्याही मास्कपेक्षा हे मास्क अधिक उपयुक्त ठरतात.(संकलन : मेघा जेठे.)




