मराठी बातम्या /बातम्या /देश /

ममता बॅनर्जींना हरवणाऱ्या भाजपा नेत्याच्या विरोधात चोरीचा गुन्हा दाखल

ममता बॅनर्जींना हरवणाऱ्या भाजपा नेत्याच्या विरोधात चोरीचा गुन्हा दाखल

पश्चिम बंगालमधील (West Bengal) ममता बॅनर्जी सरकार (Mamata Banerjee) सरकार आणि भाजपा यांच्यातील संघर्ष रोज चिघळत आहे.

पश्चिम बंगालमधील (West Bengal) ममता बॅनर्जी सरकार (Mamata Banerjee) सरकार आणि भाजपा यांच्यातील संघर्ष रोज चिघळत आहे.

पश्चिम बंगालमधील (West Bengal) ममता बॅनर्जी सरकार (Mamata Banerjee) सरकार आणि भाजपा यांच्यातील संघर्ष रोज चिघळत आहे.

  • Published by:  News18 Desk

कोलकाता, 6 जून: पश्चिम बंगालमधील (West Bengal) ममता बॅनर्जी सरकार (Mamata Banerjee) सरकार आणि भाजपा यांच्यातील संघर्ष रोज चिघळत आहे. भाजपा आमदार आणि बंगाल विधानसभेतील विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी (Suvendu Adhikari) यांच्या विरोधात चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. अधिकारी यांनीच विधानसभा निवडणुकीत नंदीग्राममधून ममता यांचा पराभव केला होता. पूर्व मिदानपूर जिल्ह्यात सुवेंदू अधिकारी आणि त्यांच्या भावाच्या विरोधात चक्रीवादळ पीडितांना देण्यासाठी आणलेले साहित्य चोरल्याचा गुन्हा तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी दाखल केला आहे.

कोंटाई नगरपालिकेच्या व्यवस्थापन मंडळाचे सदस्य असलेल्या रत्नदीप मन्ना यांनी याबाबतची लेखी तक्रार दिली आहे. त्यानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या तक्रारीनुसार, 'हिंंमाशू मन्ना आणि प्रताप डे या दोन व्यक्तींनी 29 मे रोजी नगरपालिकेच्या गोदामातून ताडपत्रींनी भरलेला ट्रक चोरला आहे. या सर्व प्रकरणात सुवेंदू  अधिकारी आणि त्यांचे बंधू सौमेंदू अधिकारी यांचा हात आहे,' असा आरोप या तक्रारीमध्ये करण्यात आला आहे. या सर्वांनी केंद्रीय सुरक्षा दलाच्या संगनमताने ही चोरी केल्याचा दावा देखील तक्रारीमध्ये करण्यात आला आहे.

विषारी दारु प्रकरणात भाजपा नेत्याला अटक; 108 जणांनी गमावला होता जीव

नगरपालिकेचे सदस्य गोदामात गेले होते, त्यावेळी त्यांची भेट हिमांशूशी झाली. त्याला याबाबत विचारणा केली असता त्याने सुवेंदू आणि सौमेंदू अधिकारी यांच्या सुचनेनुसार हा ट्रक नेत असल्याचे सांगितले आहे.

पोलिसांनी या तक्रारीनंतर आपत्कालीन व्यवस्थापन कायद्याच्या अनुसार अधिकारी बंधू, हिमांशू मन्ना आणि प्रताप डे या चौघांवर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात प्रताप डे याला अटक करण्यात आली असून त्याची चौकशी करण्यात येत आहे. या सर्व साहित्याचे नंदीग्राममधील चक्रीवादळ पीडित नागरिकांना वाटप करण्यात आले, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

First published:

Tags: BJP, Mamata banerjee, West bengal