एका मुलीवर सामुहिक बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याच्या घटनेने पश्चिम बंगालमधला दिनाजपूर जिल्हा हादरुन गेला आहे.
दिनाजपूर जिल्ह्यातल्या कलागच्च या गावात ही घटना घडली. या घटनेनंतर सर्व परिसरात प्रचंड उद्रेक झाला. लोक रस्त्यावर आले आणि त्यांनी रस्ता बंद पाडला.
लोक एवढे संतप्त झाले होते की त्यांनी रस्ता रोखून धरला आणि पोलिसांच्या गाड्याही पेटवून दिल्या. रस्त्यांवर टायरही जाळले.
लोकांचा उद्रेक वाढत असल्याने पोलिसांनी अश्रूधुराचा वापर करावा लागला. त्यानंतर जमावाला पांगविण्यात पोलिसांना यश आलं.
या घटनेमुळे प्रचंड तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. वाहतुकीचा खोळंबा झाल्याने अनेक तास वाहनांना खोळंबून राहावं लागलं.