मुंबई 4 मार्च: कोरोना (Coronavirus) महामारीमुळे संपूर्ण जग भीतीच्या सावटाखाली आहे. कोरोनापासून बचाव करण्यासाठी अनेक प्रकारचे उपाय केले जात आहेत. अशामध्ये लोकांचा हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी काढण्याकडे कल वाढला आहे. टेलिकॉम कंपनी वोडाफोन आयडियानं (Vodafone Idea - Vi) आपल्या ग्राहकांना खास गिफ्ट दिलं आहे. मोबाइल रिचार्ज (Mobile Recharge) केल्यानंतर ग्राहकांना हेल्थ इन्शुरन्सचा फायदा मिळणार आहे.
कंपनीच्या रिचार्ज प्लॅनमध्ये अवघ्या 51 रुपये आणि 301 रुपयांचा रिचार्ज केल्यानंतर कोरोना महामारी आणि इतर आजारांवर देखील कव्हर मिळणार आहे. वोडाफोन- आयडियाने आपल्या ग्राहकांना हेल्थ इन्शुरन्सचा लाभ देण्यासाठी आदित्य बिर्ला हेल्थ इन्शुरन्ससोबत (Aditya Birla Health Insurance - ABHI) पार्टनरशीप केली आहे.
व्हीआय हॉस्पिकेअर (VI Hospicare) स्कीमअंतर्गत कंपनी आपल्या ग्राहकांना 51 आणि 301 रुपयांच्या रिचार्जवर हेल्थ इन्शुरन्स फ्री देत आहे. या नवीन ऑफरअंतर्गत दोन्ही कंपन्या ज्या लोकांकडे आतापर्यंत कोणताही इन्शुरन्स प्लॅन नाही अशा लोकांसाठी मोठ्या प्रमाणात हेल्थ इन्शुरन्स कव्हर करण्याची योजना आखत आहे.
वोडाफोन-आयडियाच्या प्रीपेड युजर्सला व्हीआय हॉस्पिकेअर स्कीमअंतर्गत रुग्णालयात दाखल झाल्यानंतर कव्हर केलं जाणार आहे. कंपनी आपल्या ग्राहकाला 24 तास रुग्णालयात दाखल झाल्यानंतर एका दिवसाचे 1000 रुपये देणार आहे. तर आयसीयू ट्रीटमेंटसाठी ग्राहकांना प्रत्येक दिवसाला 2000 रुपये कव्हर मिळणार आहे. यामध्ये कोरोना सारख्या आजारांचा देखील समावेश आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कंपनीच्या 51 रुपयांच्या प्लॅनमध्ये फक्त एसएमएस सुविधा दिली जाते. या प्लॅनची व्हॅलिडिटी 28 दिवसांची असते यासोबतच यामध्ये ग्राहकांना 500 एसएमएस फ्री मिळतात. दुसरा लाभ म्हणजे यामध्ये ग्राहकांना व्हीआय हॉस्पिकेअर सुविधा मिळणार आहे. तर, 301 रुपयांच्या प्लॅनमध्ये कंपनी अनलिमिटेड पॅक ऑफर करत आहे. या प्लॅनमध्ये ग्राहकांना सर्व नेटवर्क आणि अनलिमिटेड कॉलिंग, दिवसाला 1.5GB डेटा, दिवसाला 100 SMS फ्री देत आहे. या प्लॅनची व्हॅलिडिटी 28 दिवसांची आहे. यासोबतच या प्लॅनमध्ये ग्राहकांना व्हीआय हॉस्पिकेअर सुविधा मिळणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona vaccine, Health, Technology, Vodafone, Vodafone 4G, Vodafone idea tariff plan, Vodafone services, Wellness