जाहिरात
मराठी बातम्या / देश / मोठी बातमी | भारतात VLC मीडिया प्लेअरवर बंदी! वेबसाईटही ब्लॉक, जाणून घ्या कारण

मोठी बातमी | भारतात VLC मीडिया प्लेअरवर बंदी! वेबसाईटही ब्लॉक, जाणून घ्या कारण

मोठी बातमी | भारतात VLC मीडिया प्लेअरवर बंदी! वेबसाईटही ब्लॉक, जाणून घ्या कारण

भारतातील सर्वात लोकप्रिय असलेलं स्ट्रीमिंग मीडिआ आता तुम्हाला वापरता येणार नाही. सगळे व्हिडीओ या मीडिया प्लेअरवर पाहताय यायचे मात्र आता अनेकांची गैरसोय होणार आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई : भारतातील सर्वात लोकप्रिय असलेलं स्ट्रीमिंग मीडिआ आता तुम्हाला वापरता येणार नाही. सगळे व्हिडीओ या मीडिया प्लेअरवर पाहताय यायचे मात्र आता अनेकांची गैरसोय होणार आहे. VLC मीडिया प्लेअरवर भारतात बंदी घालण्यात आली आहे. आता भारतात VLC मीडिया प्लेअर वापरता येणार नाही. MediaName च्या अहवालानुसार VideoLAN प्रोजेक्टद्वारे बनवलेला VLC प्लेअर सुमारे दोन महिन्यांपूर्वी भारतात ब्लॉक करण्यात आला. सरकार किंवा कंपनीने या बंदीबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केली नाही. आयटी अॅक्ट 2000 अंतर्गत सरकारने यावर बंदी घातली असल्याचे अनेक अहवालातून समोर आलं आहे. व्हीएलसी मीडियाची वेबसाईट ओपन केल्यावर आयटी अॅक्ट अंतर्गत बॅन केल्याचा मेसेज लिहून येत आहे. कोणीही कोणत्याही प्लॅटफॉर्मवरून VLC मीडिया प्लेअर अॅक्सीस करू शकत नाही किंवा डाऊनलोड देखील होत नसल्याचं समोर आलं आहे. ACT Fibernet, Vodafone-Idea आणि इतरांसह सर्व प्रमुख ISPs वर VLC मीडिया प्लेयर ब्लॉक केल्याची चर्चा आहे. भारत सरकारने अनेक चीनी अॅपवर बंदी घातली आहे. पब्जी मोबाईलच्या भारतीय एडिशनवरही बंदी घातली आहे. BGMI ला गुगल प्ले स्टोरवरून हटवण्यात आलं आहे. याधी टिकटॉक, हेलो सारखे अनेक चीनी अॅपवर बंदी घालण्यात आली आहे. हे अॅप्स ब्लॉक करण्यामागचे कारण म्हणजे हे प्लॅटफॉर्म युजरचा डेटा चीनला पाठवत असल्याची माहिती समोर आली होती. डेटा सुरक्षेच्या कारणास्तव ही कारवाई करण्यात आली होती. आता व्हीएलसी मीडिया प्लेअरवरही बंदी घालण्यात आली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात