मराठी बातम्या /बातम्या /देश /

ऑक्सिजन सपोर्टवर स्वयंपाक करणाऱ्या महिलेच्या मदतीसाठी सेहवागचा पुढाकार, केली मोठी घोषणा

ऑक्सिजन सपोर्टवर स्वयंपाक करणाऱ्या महिलेच्या मदतीसाठी सेहवागचा पुढाकार, केली मोठी घोषणा

ऑक्सिजन कॉन्सेन्ट्रेटरमधून (Oxygen Concentrator) त्या महिलेला ऑक्सिजनचा पुरवठा केला जात आहे. त्या परिस्थितीमध्येही ती महिला स्वयंपाक करत आहे. वीरेंद्र सेहवागनं (Virendra Sehwag) तो फोटो शेअर करत मोठी घोषणा केली आहे.

  • Published by:  News18 Desk

नवी दिल्ली, 24 मे : देशात कोरोना व्हायरसच्या महामारीचा (corona pandemic) उद्रेक झाला आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अनेक रुग्णांना ऑक्सिजनची कमतरता जाणवत आहे. रुग्णांचे नातेवाईक आपल्या जवळच्या व्यक्तींना ऑक्सिजनची सोय व्हावी म्हणून वेगवेगळ्या माध्यमातून प्रयत्न करत आहेत. या परिस्थितीमध्ये एक फोटो ट्विटरवर (Twitter) सध्या व्हायरल (Viral) झाला आहे. या फोटोमध्ये एक मध्यमवयीन महिला स्वयंपाक करताना दिसते आहे. मात्र विशेष बाब म्हणजे तिच्या नाकाला ऑक्सिजन मास्क (Oxygen Mask) लावलेला असून, जवळ ठेवलेल्या ऑक्सिजन कॉन्सेन्ट्रेटरमधून (Oxygen Concentrator) त्या महिलेला ऑक्सिजनचा पुरवठा केला जात आहे.

या व्हायरल फोटोवर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. नाजूक परिस्थितीमध्ये त्या महिलेला काम करायला लावणं हा क्रूरपणा आहे, अशा भावना अनेकांनी व्यक्त केल्या आहेत. ज्या व्यक्तीने हा फोटो शेअर केला, त्या व्यक्तीला फोटो सोशल मीडियावर शेअर करण्याइतकी समज आहे, मग खरं तर त्या व्यक्तीकडे  महिलेला किचनमध्ये मदत करण्याइतकी प्रगल्भता असायला हवी होती, असं काही जणांनी म्हटलं आहे.

टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग (Virendra Sehwag) याने देखील हा फोटो शेअर केला आहे. सेहवाग केवळ हा फोटो शेअर करुन थांबला नाही. तर त्याने या महिलेला मदत करण्याची इच्छा देखील व्यक्त केली आहे. या महिलेला किंवा त्याच्या कुटुंबीयांना कुणी ओळखत असेल, तर कृपया आमच्याशी संपर्क करा. त्या बऱ्या होईपर्यंत त्यांच्या संपूर्ण कुटुंबीयांना जेवण देण्याची आमचा तयारी आहे, असे सेहवागने ट्विट केले आहे.

भारताच्या अन्य क्रिकेटपटूंप्रमाणे वीरेंद्र सेहवागने देखील कोरोना रुग्णांच्या मदतीसाठी पुढाकार घेतला आहे. या रुग्णांच्या मदतीसाठी ऑक्सिजन कंन्सट्रेटर तसेच भोजन देण्याची व्यवस्था सेहवाग फाऊंडेशनने केली आहे. त्याचबरोबर एखाद्या कोरोना रुग्णाला अन्य गोष्टींची मदत हवी असेल, तर संपर्क साधण्याचं आवाहन देखील त्याने केले आहे.

First published:

Tags: Coronavirus, Oxygen supply, Photo viral, Virender sehwag