जाहिरात
मराठी बातम्या / देश / VIDEO : महिला उमेदवाराच्या केसात सापडला मंत्र्याचा हरवलेला चश्मा; प्रचारादरम्यान स्टेजवर घडला हा प्रकार

VIDEO : महिला उमेदवाराच्या केसात सापडला मंत्र्याचा हरवलेला चश्मा; प्रचारादरम्यान स्टेजवर घडला हा प्रकार

VIDEO : महिला उमेदवाराच्या केसात सापडला मंत्र्याचा हरवलेला चश्मा; प्रचारादरम्यान स्टेजवर घडला हा प्रकार

VIDEO Viral झाल्यानंतर काँग्रेसकडून महिला उमेदवारासोबत छेडछाडीचा प्रकार असल्याची टीका केली जात आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मध्य प्रदेश, 18 ऑक्टोबर : सतनाच्या रेगाव विधानसभा जागेच्या प्रचार सभेचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल (Video Viral On Social Media) होत आहे. व्हिडीओमध्ये मध्य प्रदेश सरकारमधील मंत्री बृजेंद्र प्रताप सिंह व्यासपीठावर उभ्या असलेल्या महिला उमेदवाराच्या केसात आपला चश्मा शोधताना दिसत आहेत. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर काँग्रेसकडून (Congress) टीका केली जात आहे. हे प्रकरण महिला सुरक्षेशी जोडले जात असून अनेक सवाल उपस्थित केले जात आहे. असा अडकला महिला उमेदवाराच्या केसात चश्मा आता प्रश्न हा आहे की, मंत्र्यांचा चश्मा भाजप उमेदवार महिलेच्या केसात कसा अडकला? यासंदर्भातील वृत्त लाइव्ह हिंदूस्तानने शेअर केले आहे. शिवराज सिंह चौहान यांच्या जनसभेचा संपूर्ण व्हिडीओ पाहताना दिसतं की, रेगाव विधानसभेच्या भागात सेमरवाराच्या जनसभेत सीएम मंचावर बसलेले नेता आणि स्थानिकांचं नाव संंबोधित करीत होते. यादरम्यान एका नेत्याचं नाव सांगण्यासाठी मंत्री बृजेंद्र प्रताप सिंह उठून उभे राहिले. जेव्हा तर परत आपल्या सीटवर बसण्यासाठी जात होते, तेव्हा सीएमच्या जवळ उभ्या असलेल्या महिला उमेदवार प्रतिमा बागडीच्या केसात मंत्र्याच्या खिशात अडकेला चश्मा अडकला. मंत्र्यांचा चश्मा महिलेच्या केसात अडकून लटकू लागला. ना मंत्रा आणि ना मंत्र्यांना हे लक्षात आलं. हे ही वाचा- भारत विक्रमी 100 कोटी लसीकरणाच्या अगदी जवळ; या आठवड्यात घडेल इतिहास मंत्री शोधू लागले चश्मा… काही वेळानंतर मंत्री बृजेंद्र प्रताप सिंह यांनी पाहिलं तर त्यांचा चश्मा खिशात नव्हता. चश्माची गरज वाटली म्हणून ते खिसे तपासू लागले. जेव्हा त्यांना चश्मा सापडला नाही म्हणून ते इथं-तिथं पाहू लागले. मंत्र्यांच्या शेजारी बसलेल्या नेत्यांनी त्यांना इशाराने महिला उमेदवाराच्या केसांजवळ खूण केली. यावेळी प्रतिमा यांना न सांगता त्यांनी त्यांच्या केसातून चश्मा काढला. याबाबत कळताच आजूबाजूचे लोक त्यांच्याकडे पाहून हसू लागले.

जाहिरात

हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर काँग्रेसने शिवराज सिंह चौहान आणि त्यांच्या सरकारवर टीका केली आहे. महिलासोबत छेडछाड केल्याचं सांगत, मुख्यमंत्र्याच्या उपस्थितीत महिलांच्या सुरक्षिततेबाबत सवाल उपस्थित केला आहे. या प्रकरणात

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात