बडोदा, 14 फेब्रुवारी : गुजरातमध्ये सहा महापालिकांच्या निवडणुकांची रणधुमाळी सध्या सुरू आहे. रविवारच्या निमित्ताने ठिकठिकाणी प्रचारसभा होत आहेत. बडोद्यातील निजामपुरा भागात मुख्यमंत्री विजय रुपानी यांची आज प्रचारसभा होती. या प्रचारसभेत मुख्यमंत्र्यांची तब्येत अचानक बिघडली आणि भाषण देत असतानाच चक्कर आल्याने ते स्टेजवरच कोसळले. त्यांचा बीपी कमी झाल्याने त्यांना चक्कर आली असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
या घटनेनंतर तातडीने रुपानी यांनी बडोद्यातून अहमदाबादला हलविण्यात आले आहे. सरकारी विमानाने रुपानी यांनी रवानगी अहमदाबादला करण्यात आली असून, तिथल्या यूएन मेहता रुग्णालयात आता त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत. तिथे त्यांच्या सर्व चाचण्या करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. सध्या रुपानी यांची शुगर आणि बीपी नियंत्रणात असल्याची माहिती यंत्रणेकडून देण्यात आली आहे.
View this post on Instagram
सध्या मुख्यमंत्र्यांची प्रकृती ठीक असल्याची माहिती समोर आली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Gujrat