S M L

उपराष्ट्रपतीपदासाठी मतदान सुरू, संध्याकाळपर्यंत निकाल अपेक्षित

निवडणुकीत मतदान करू शकतात. एनडीए खासदारांचं संख्याबळ अधिक असल्याने व्यंकय्या नायडूंचा विजय जवळपास निश्चित मानला जातोय. उपराष्ट्रपतीपदाचा निकालही आजच लागणार आहे. त्यामुळे आज संध्याकाळपर्यंत देशाला नवा उपराष्ट्रपती मिळेल.

Chandrakant Funde | Updated On: Aug 5, 2017 10:31 AM IST

उपराष्ट्रपतीपदासाठी मतदान सुरू, संध्याकाळपर्यंत निकाल अपेक्षित

नवी दिल्ली, (प्रतिनिधी), 5 ऑगस्ट :  निवडणुकीत मतदान करू शकतात. एनडीए खासदारांचं संख्याबळ अधिक असल्याने व्यंकय्या नायडूंचा विजय जवळपास निश्चित मानला जातोय. उपराष्ट्रपतीपदाचा निकालही आजच लागणार आहे. त्यामुळे आज संध्याकाळपर्यंत देशाला नवा उपराष्ट्रपती मिळेल.उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी सकाळी 10 वाजेपासून मतदान सुरू झालंय. एनडीएकडून व्यंकय्या नायडू आणि यूपीएकडून गोपालकृष्ण गांधी हे उमेदवार आहेत. संध्याकाळी 5 वाजेपर्यंत मतदान सुरू राहणार आहे. मतदानानंतर लगेचच निवडणुकीचा निकालही जाहीर होणार आहे. या निवडणुकीत संसदेचे सर्व खासदार मतदान करणार आहेत. दोन्ही सभागृहाचे मिळून 790 खासदार या निवडणुकीत मतदानसाठी पात्र आहेत.

राष्ट्रपतीच्या निवडणुकीत एनडीएला पाठिंबा दिलेल्या बीजू जनता दल आणि नितीशकुमारांच्या जेडियूने उपराष्ट्रपतीपदासाठी मात्र युपीए उमेदवाराला पाठिंबा दर्शवलाय. विशेष म्हणजे याच नितीशकुमारांनी बिहारमध्ये मात्र, भाजपच्या पाठिंब्यावर नुकतीच सत्ता स्थापन केलीय. तरीही उपराष्ट्रपतीपदासाठी त्यांनी गोपालकृष्ण गांधी यांनाच पसंती दिलीय. या निवडणुकीतही राजकीय पक्षांना व्हिप जारी करता येत नसल्याने क्रॉस वोटिंगची शक्यता वर्तवली जातेय.

मावळते उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांचा कार्यकाळ 10 ऑगस्टला समाप्त होतोय. त्यानंतर नवे उपराष्ट्रपती त्यांचा कार्यभार स्वीकारतील

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 5, 2017 10:22 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close