दिल्ली,15 डिसेंबर : उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी ‘पेड न्यूज’ म्हणजे माध्यमांना लागलेली कीड आहे असं वक्तव्य केलं आहे. माध्यमांचा वापर हा समाजाच्या भल्यासाठी करावा असं आव्हानही त्यांनी केलं आहे. मराठी वृत्तपत्राच्या दिल्ली आवृत्तीच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. पेड न्यूज ही दिवसेंदिवस धोकादायक बनत चालली आहे. ते म्हणाले की, ‘माध्यमांकडे समाजाला प्रभावित करण्याची ताकद आहे, त्यामुळे या ताकदीचा योग्य आणि जाणीवपूर्वक वापर झाला पाहिजे.’ मातृभाषेतून शिक्षणाचं समर्थन करताना नायडू म्हणाले की, ‘आंध्रप्रदेशच्या एका तेलुगू माध्यम विद्यालयात शिकूनही मी आज या पदापर्यंत पोहोचलो आहे. खरं तर मी कोणत्याही भाषेच्या विरूद्ध नाही पण आज काल पालक आपल्या मुलांना इंग्रजी बोलण्यासाठी,शिक्षणाची सक्ती करतात. जे खूप चुकीचं आहे.’ माध्यमांविषयी बोलताना नायडू म्हणाले की, ‘माध्यमं हे समाजाचा आरसा आहेत. त्यांनी जबाबदारीने अभिव्यक्ती स्वातंत्र्यचा वापर करावा. प्रसारमाध्यमांना ताकीद देत ते म्हणाले की माध्यमांनी कोणत्याही अफवा पसरवण्याचं साधन बनू नये.’
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.