S M L

व्यंकय्या नायडू देशाचे नवे उपराष्ट्रपती

व्यंकय्या नायडू यांनी 516 मतांनी यूपीएचे उमेदवार गोपाळकृष्ण गांधी यांचा पराभव केलाय.

Sachin Salve | Updated On: Aug 5, 2017 07:37 PM IST

व्यंकय्या नायडू देशाचे नवे उपराष्ट्रपती

05 आॅगस्ट : 05 आॅगस्ट : उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत एनडीएचे उमेदवार व्यंकय्या नायडू यांचा दणदणीत विजय झालाय. व्यंकय्या नायडू यांनी 516 मतांनी यूपीएचे उमेदवार गोपाळकृष्ण गांधी यांचा पराभव केलाय. 11 आॅगस्ट रोजी व्यंकय्या नायडू उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेणार आहे.

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीनंतर उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक सुद्धा एनडीएने जिंकली. एनडीएचे उमेदवार व्यंकय्या नायडू हे देशाचे नवे उपराष्ट्रपती असणार आहे. उपराष्ट्रपतीपदासाठी

आज 98 टक्के मतदान झालं. एकूण 785 पैकी 771 मतदान झालंय.

एनडीए खासदारांची संख्या जास्त असल्यामुळे व्यंकय्या नायडूंचं पारडं जड होतं. त्यामुळे त्यांचा विजय अपेक्षित होता.  771 मतांपैकी नायडू यांना 516 मतं मिळाली. तर यूपीएकडून माजी आयएएस अधिकारी आणि महात्मा गांधींचे नातू गोपाळकृष्ण गांधी उभे होते. त्यांना फक्त 244 मतं मिळाली.

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत ज्या प्रमाणे विरोधकांची मतं फुटली होती त्याप्रमाणे उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीतही 11 मतं फुटली आहे.

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 5, 2017 07:08 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close