भोपाळ : भोपाळहून दिल्लीला जाणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसला आग लागली आहे. या ट्रेनला नुकतंच पंतप्रधान नरेंद्र मोदी हिरवा झेंडा दाखवला होता. ही ट्रेन दिल्लीहून भोपाळला आली होती. भोपाळहून दिल्लीच्या दिशेनं निघाली असताना एका डब्याला आग लागल्याची माहिती मिळाली आहे. प्राथमिक माहितीनुसार बॅटरीमधून ही आग लागल्याची माहिती प्रवाशांनी दिली. या डब्यात साधारण 26 प्रवासी होते अशी माहिती मिळाली आहे. या ट्रेनला वीणा स्थानकात थांबवण्यात आलं आहे. आग लागल्याची माहिती मिळताच तातडीनं ट्रेन थांबवण्यात आली.
भोपाळहून दिल्लीला जाणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसला आग #fire #bhopal #delhi #vandebharat pic.twitter.com/f6Baa2jAW9
— News18Lokmat (@News18lokmat) July 17, 2023
प्रवाशांना सुखरुप बाहेर काढण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. तर आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलं आहे. सकाळी 5.30 वाजता हजरत निजामुद्दीन इथून ही ट्रेन भोपाळहून ही ट्रेन निघाली. त्यानंतर वीणा स्थानकाआधी या ट्रेनला आग लागली. ही आग नेमकी कशामुळे लागली याचा शोध सुरू आहे. सीटच्या खालून ही आग आली असा दावा प्रवाशांनी केला आहे. वंदे भारत एक्सप्रेसमध्ये पहिल्यांदाच अशी घटना समोर आली आहे. या दुर्घटनेवर अद्याप रेल्वे प्रशासन किंवा अधिकाऱ्यांना कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही.