नवी दिल्ली, 12 जानेवारी : प्रत्येक व्यक्ती काहीतरी स्वप्न पाहत असते. काहीतरी वेगळं आणि हटके करुन नाव कमवावं असं प्रत्येकाला वाटत असतं. समाजात आपली वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी अनेकजण मेहनत घेतात आणि नावारुपाला येतात. असेच एक व्यक्तिमत्व म्हणजे सहारनपूर जिल्ह्यातील पूनम बाली. डोळे मिटून पूनम बाली 5 मिनिटांत केस कापते. यामुळे ती कायम चर्चेत असते. या पुनमविषयी आज आपण जाणून घेऊया. पूनम बालीने तिचे उच्च शिक्षण पूर्ण केले आणि सौंदर्य क्षेत्रात स्वतःचे नाव कमावले. सध्या पूनम बाली अनेकांसाठी प्रेरणास्त्रोत बनली आहे. पूनम बालीने एम.एस्सी. बीएड केल्यानंतर आयजीडी बॉम्बे आर्टमधून शिवणकाम आणि भरतकामात प्रथम क्रमांक मिळवला आणि डिप्लोमा घेऊन सौंदर्य क्षेत्रात पाऊल ठेवले. चांगली ओळख निर्माण करून पूनमने केवळ स्वतःचेच नाही तर शहराचे नावही रोशन केले. आज सौंदर्य क्षेत्राशी निगडित सर्व मोठ्या नावांमध्ये सहारनपूरच्या पूनम बालीचे नावही प्रसिद्ध आहे.
पूनम बालीने 2001 साली जिल्हा बीडल पुरस्कारही जिंकला आहे. हे यश मिळवल्यानंतर तिने मागे वळून पाहिले नाही. त्यानंतर पूनम बालीने दरवर्षी एक ना एक कामगिरी आपल्या नावावर केली. दिवा युनिट पंजाब झोन, दिल्ली कडून ब्युटी स्टार पुरस्कार प्राप्त केला. पूनम बालीने केवळ सौंदर्य क्षेत्रातच नाव कमावले नाही, तर हेअर कटमध्येही तिने एक वेगळी कला आत्मसात केली आहे. पूनम बालीने सांगितले की ती डोळ्यांवर पट्टी बांधून वेगवेगळ्या प्रकारे केस कापू शकते. पूनम बालीला केस कापण्यासाठी जास्तीत जास्त ५ मिनिटे लागतात. पूनम बालीची ही अनोखी कला अनेक टीव्ही चॅनेल्सनीही दाखवली आहे.
2018 साली पूनम बालीने केस कापण्याच्या कलेमध्ये राष्ट्रीय विक्रम नोंदवून सर्वांना आश्चर्यचकित केले. पूनम बालीने सौंदर्य क्षेत्रात समर्पणाने काम केले आहे. ज्याच्या जोरावर तिने आज बड्या व्यक्तींमध्ये आपले नाव बनवले आहे. यासोबतच पूनम वालीची आणखी एक खासियत आहे. ती गरजू मुलींना सौंदर्य क्षेत्रात काम शिकवून स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी प्रोत्साहन देत आहे. यासोबतच शिकणाऱ्या मुली त्यांच्या संस्थेत काम करतात. त्या मुलींच्या लग्नात पूनम वाली सक्रिय सहभाग घेते. आणि त्यांच्या शक्य तेवढे सहकार्य करते. पूनम बाली अनेक स्वयंसेवी संस्थांसोबतही जवळून काम करत आहेत. तिचं म्हणणं आहे की. एखाद्याला मदत करणे किंवा इतर सामाजिक कार्यात भाग घेतल्याने त्यांचे मनोबल नेहमीच वाढते. आर्थिक पाठबळ देऊन पूनम बालीने ‘विशिष्ट महिला’ आणि दामिनी हे पुरस्कार पटकावले आहेत.