मराठी बातम्या /बातम्या /देश /UP Global Investors Summit : उत्तर प्रदेशात मुकेश अंबानी करणार मोठी गुंतवणूक, 1 लाख बेरोजगारांना मिळणार रोजगार

UP Global Investors Summit : उत्तर प्रदेशात मुकेश अंबानी करणार मोठी गुंतवणूक, 1 लाख बेरोजगारांना मिळणार रोजगार

UP Global Investors Summit : मुकेश अंबानी यांनी येत्या चार वर्षात मोठी गुंतवणूक करणार असल्याचं सांगितलं आहे.

UP Global Investors Summit : मुकेश अंबानी यांनी येत्या चार वर्षात मोठी गुंतवणूक करणार असल्याचं सांगितलं आहे.

UP Global Investors Summit : मुकेश अंबानी यांनी येत्या चार वर्षात मोठी गुंतवणूक करणार असल्याचं सांगितलं आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 10 फेब्रुवारी : उत्तर प्रदेशात आजपासून तीन दिवसीय युपी ग्लोबल इन्व्हेस्टर्स समिटची सुरुवात झाली आहे. याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. यावेळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हेसुद्धा उपस्थित होते. याशिवाय देशातील बड्या उद्योगपतींनीही यामध्ये उपस्थिती दर्शवली होती. यात मुकेश अंबानी, कुमार मंगलम् बिर्ला हे उद्योगपती होते.

रिलायन्स उद्योग समुहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी यावेळी म्हटलं की, कायदा व्यवस्थेत सुधारणा आणि इज ऑफ डुइंग बिझनेसमध्ये सुधारणा केल्याने उत्तर प्रदेश नव्या भारतासाठी आशेचं केंद्र बनला आहे. राज्याच्या विकासासाठी उद्योग आणि सहकार्य या दोन्हींची गरज असून उत्तर प्रदेश पूर्ण करत आहे.

मुकेश अंबानी यांनी येत्या चार वर्षात उत्तर प्रदेशात ७५ हजार कोटींची गुंतवणूक करणार असल्याची घोषणा केली. या गुंतवणुकीतून १ लाख नवे रोजगार निर्माण होतील असा अंदाज आहे. लखनऊमध्ये आयोजित युपी ग्लोबल इन्व्हेस्टर्स समिटमध्ये बोलताना मुकेश अंबानी म्हणाले की, ५ वर्षांच्या आत उत्तर प्रदेश १ ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनेल. २०२३ पर्यंत उत्तर प्रदेशातील सर्व शहरांमध्ये ५जी सेवा सुरू करण्यात येईल असंही त्यांनी म्हटलं.

RBI Monetary Policy: RBI च्या निर्णयाचा शेअर मार्केटवर मोठा परिणाम

रिलायन्सने उत्तर प्रदेशात बायो गॅस एनर्जी बिझनेसमध्ये उतरण्याची घोषणा केलीय. यावर मुकेश अंबानी यांनी म्हटलं की, बायो गॅसमुळे पर्यावरणाला फायदा होईलच, त्यासोबत शेतकऱ्यांनाही लाभ होईल. शेतकरी अन्नदाते आहेतच पण त्यासोबत ते उर्जादातेही आहेत. यासोबत मुकेश अंबानी यांनी आणखी एक घोषणा केली. रिलायन्सकडून उत्तर प्रदेशात १० गीगावॅटची नवनिर्मितीक्षम उर्जा क्षमता स्थापन करेल. उत्तर प्रदेशातील ही सर्वात मोठी अक्षय उर्जा योजना असेल.

First published:
top videos

    Tags: Mukesh ambani, Mumbai