मराठी बातम्या /बातम्या /देश /UP Election : प्रचार सभेदरम्यान अचानक बाइकवर बसल्या प्रियंका गांधी, आणि...

UP Election : प्रचार सभेदरम्यान अचानक बाइकवर बसल्या प्रियंका गांधी, आणि...

प्रियांका गांधींना बाईकवर फिरताना पाहून कार्यकर्त्यांमध्येही उत्साह संचारला.

प्रियांका गांधींना बाईकवर फिरताना पाहून कार्यकर्त्यांमध्येही उत्साह संचारला.

प्रियांका गांधींना बाईकवर फिरताना पाहून कार्यकर्त्यांमध्येही उत्साह संचारला.

कुशीनगर, 28 फेब्रुवारी : कुशीनगरमधील (Kushinagar) तमकुहीराज येथे विधानसभा निवडणुकीदरम्यान प्रचार सभा घेण्यासाठी आलेल्या काँग्रेसच्या प्रदेश प्रभारी प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) अचानक बाइकवर बसून सेवरही नगरमध्ये फिरू लागल्या. वाहतूक खोळंबा झाला कारणाने प्रियंका गांधी प्रदेश अध्यक्ष अजय कुनार लल्लूंच्या बाईकच्या मागे बसल्या.

तब्बल 20 मिनिटांपर्यंत प्रियांका गांधींनी सेवरही नगरमध्ये प्रवास केला आणि यानंतर अजय कुमार लल्लूंच्या घरी जाऊन प्रियांका यांनी  त्यांच्या आई-वडिलांची भेट घेतली. यादरम्यान प्रियंका गांधीचे अंगरक्षख मात्र त्यांच्या सुरक्षेसाठी त्यांच्या मागे होते. प्रियंका गांधींना आपल्यासोबत बाइकवर फिरताना पाहून लोकांमध्ये उत्साह संचारला. लोकांनी समर्थनार्थ घोषणाबाजी सुरू केली. तमकुहीराज विधानसभेतून काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष अजय कुमार लल्लू निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. अजय लल्लू यांच्या समर्थनार्थ काँग्रेसच्या प्रदेश प्रभारी प्रियंका गांधी सेवरच्या गौरी नगर स्थित लोकनायक इंटर काॅलेजमध्ये जाहीर सभा संबोधित करण्यासाठी पोहोचल्या होत्या.

हे ही वाचा-"यूपीमधील अनेक नागरिक मुंबईत, या उत्तरभारतीयांची जबाबदारी आमची" : आदित्य ठाकरे

प्रियंका गांधींनी अजय कुमार लल्लूच्या आई-वडिलांची भेट घेतली. यानंतर त्या घराबाहेर निघाल्या तर संपूर्ण रस्त्यावर गर्दी झाली होती. रस्ता जाम झाल्यामुळे प्रियंका गांधींनी अजय कुमार लल्लू यांना बाइक आणायला सांगितली आणि त्यांना हॅलीपॅडपर्यंत जाण्यास सांगितलं. यानंतर अजय कुमार लल्लू यांनी एक बाइक घेतली. प्रियंका गांधी त्यांच्या मागे बसल्या. तब्बल 2 किमी बाइकने प्रवास करून त्याला हॅलीपॅडपर्यंत पोहोचल्या.

First published:

Tags: Priyanka gandhi, Priyanka gandhi vadra, UP Election