मराठी बातम्या /बातम्या /देश /

Solar City of India : भारतातलं हे एकमेव शहर; जे चालतं 100 टक्के सौर उर्जेवर

Solar City of India : भारतातलं हे एकमेव शहर; जे चालतं 100 टक्के सौर उर्जेवर

हवामान बदलाला (Climate change) सामोरे जाण्यासाठी भारतासह जगभरात जीवाश्म इंधनांचा वापर थांबवण्यासाठी दबाव वाढत आहे. परंतु, आजही भारतातील बहुतांश वीज औष्णिक विद्युत केंद्रांमधील कोळशापासून निर्माण होत आहे.

हवामान बदलाला (Climate change) सामोरे जाण्यासाठी भारतासह जगभरात जीवाश्म इंधनांचा वापर थांबवण्यासाठी दबाव वाढत आहे. परंतु, आजही भारतातील बहुतांश वीज औष्णिक विद्युत केंद्रांमधील कोळशापासून निर्माण होत आहे.

हवामान बदलाला (Climate change) सामोरे जाण्यासाठी भारतासह जगभरात जीवाश्म इंधनांचा वापर थांबवण्यासाठी दबाव वाढत आहे. परंतु, आजही भारतातील बहुतांश वीज औष्णिक विद्युत केंद्रांमधील कोळशापासून निर्माण होत आहे.

  • Published by:  News18 Desk

नवी दिल्ली, 12 ऑक्टोबर : ऊर्जा निर्मिती हे भारतासमोरील एक प्रमुख आव्हानात्मक क्षेत्र आहे. हवामान बदलाला (Climate change) सामोरे जाण्यासाठी भारतासह जगभरात जीवाश्म इंधनांचा वापर थांबवण्यासाठी दबाव वाढत आहे. परंतु, आजही भारतातील बहुतांश वीज औष्णिक विद्युत केंद्रांमधील कोळशापासून निर्माण होत आहे. अशा परिस्थितीत भारत सरकार विजेसाठी पर्यायी स्त्रोतांनाही प्रोत्साहन देतंय, ज्यामध्ये सौर ऊर्जा प्रमुख आहे. केंद्रशासित प्रदेश दीव (Diu is the first solar city of India) हे देशातील पहिले असे शहर आहे, जिथे गेल्या काही वर्षांपासून संपूर्ण शहर दररोज 100 टक्के सौरऊर्जेवर चालत आहे.

असा पहिला केंद्रशासित प्रदेश

दीव हे तांत्रिकदृष्ट्या शहर नसले तरी हा जिल्हा देशातील पहिला असा केंद्रशासित प्रदेश आहे, जिथे गेल्या पाच वर्षांपासून दिवसा सौरऊर्जेचा पुरवठा केला जात आहे. सुमारे दोन सौर उद्याने आणि 112 सरकारी प्रतिष्ठानांच्या वर बसवलेल्या छतावरील पॅनेलमधून वीजेचा पुरवठा होत आहे. त्यातून निर्माण होणारी वीज संपूर्ण शहराला दिवसाच्या कामांसाठी ऊर्जेच्या गरजा पूर्ण करण्यासाठी पुरेशी आहे.

केंद्रशासित प्रदेश

दीव केंद्रशासित प्रदेश दमण आणि दीव अंतर्गत येतो, दोन्ही भौगोलिकदृष्ट्या वेगळे प्रदेश आहेत, परंतु प्रशासकीयदृष्ट्या दोन्ही एकाच संस्थेच्या अंतर्गत येतात. दीवचे प्रशासन थेट भारत सरकारच्या अखत्यारीत आहे आणि त्याचे स्वतःचे कोणतेही राज्य सरकार नाही. दीव हे गुजरात राज्याच्या दक्षिणेकडे आहे.

हे वाचा - पैशांचा पाऊस पाडण्याच्या लालसेतून वाघाच्या बछड्याची शिकार, नागपुरातील धक्कादायक घटना

दिवसभर वीज फक्त सौर उर्जेपासून

या 42 चौरस किलोमीटरच्या क्षेत्रात वसलेल्या या शहरात सुमारे 7 मेगावॅट ऊर्जेची मागणी आहे. सर्व घरे, वातानुकूलित रिसॉर्ट्स, दीवचे 60 बेडचे हॉस्पिटल, एअर कंडिशन असलेली सर्व सरकारी बिगर सरकारी कार्यालये, इमारती, आइस्क्रीम कारखाने, फिश वेअरहाऊस इत्यादी दीवमध्ये दिवसभर सौरऊर्जेवर चालतात.

दोन ऊर्जा प्रकल्प

दीवमध्ये ऊर्जा विभागाने 13 आणि 10 मेगावॅट क्षमतेचे दोन सौर ऊर्जा प्रकल्प उभारले आहेत. तर छतावरील यंत्रणेची क्षमता 3 मेगावॅट क्षमतेची आहे. पूर्वी दीव त्याच्या ऊर्जा पुरवठ्यासाठी पूर्णपणे गुजरातवर अवलंबून होते. मात्र, आता सौर ऊर्जेतून शिल्लक राहिलेली वीज गुजरातला पुरवली जाते. त्याचबरोबर रात्रीच्या वेळी किंवा ढगाळ दिवसांमध्ये उर्जा निर्मितीचा अभाव असल्यास इतर स्त्रोतांमधूनही ऊर्जा पुरवली जाऊ शकते, अशी संपूर्ण व्यवस्था दीवच्या ऊर्जा विभागाकडून करण्यात आली आहे. ही व्यवस्था देशातील इतर भागातही आहे, जिथे सौरऊर्जा निर्मिती करून स्थानिक गरजा पूर्ण केल्या जातात.

हे वाचा - OMG! छोट्याशा मांजराला बलाढ्य चित्ताही घाबरला; शिकार करायला गेला आणि स्वतःच पळाला

या सौर उद्यानांचे काम कधी सुरू झाले

दीवमध्ये सौर ऊर्जेच्या वापरासाठी प्रयत्न 2013 मध्ये सुरू झाले. दीवमधील अनेक क्षेत्रे नापीक आणि खडकाळ आहेत, जी सरकारी ताब्यात आहेत. याचा फायदा घेत सौर उर्जा प्रकल्पांसाठी अशी जमीन निवडली गेली, जी इतर बाबींसाठी निरुपयोगी आहे. इथे लोकसंख्येची घनता कमी आहे. ही सौर उद्याने 2013 मध्ये कार्यान्वित झाली असली तरी वर्ष 2017 मध्ये विभागाला कळले की, ते आता पूर्ण शहराची दिवसाची मागणी पूर्ण करू शकत आहेत.

First published:

Tags: India, Union territory