नवी दिल्ली, 11 मार्च : संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचं (Budget Session) दुसरं सत्र सुरू आहे. या अधिवेशनात शेतकरी आंदोलन, पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किंमती यासारख्या वेगवेगळ्या मुद्यावरुन विरोधक आक्रमक आहेत. संसदेच्या दोन्ही सभागृहात सध्या सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये खडाजंगी होत आहे. त्याचवेळी संसदेच्या परिसरात वेगवेगळ्या पक्षांच्या नेत्यांच्या गाठीभेटी देखील सुरू आहेत.
केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह (Giriraj Singh) आणि काँग्रेस खासदार शशी थरुर (Shashi Tharoor) यांच्यातील कानगोष्टीचा एक फोटो सोशल मीडियावर (Social Media) सध्या चांगलाच व्हायरल झाला आहे. हा फोटो व्हायरल (Viral) होताच यावर वेगवेगळ्या चर्चाही सुरू झाल्या होत्या. अखेर स्वत: शशी थरुर यांनी या विषयावर स्पष्टीकरण दिलं आहे.
काय म्हणाले थरुर?
व्हायरल झालेल्या फोटोमध्ये गिरीराज सिंह आणि शशी थरुर या दोन्ही नेत्यांनी चेहऱ्यावर मास्क परिधान केला आहे. संसद भवन परिसरातील हा फोटो असून यामध्ये गिरीराज सिंह थरुर यांच्या अगदी जवळ जाऊन त्यांच्या कानात काही तरी सांगताना दिसत आहेत.
थरुर यांनी हा फोटो नेमका कधीचा आहे याचं स्पष्टीकरण ट्विटरवरुन दिलं आहे. 'मी ज्यावेळी गिरीराज सिंह यांना मत्स्यपालन हे स्वतंत्र मंत्रालय नाही. पशूपालन मंत्रालयाच्या अंतर्गत येणारा एक विभाग आहे. त्यामुळे राहुल गांधी वेगळ्या मंत्रालयाची मागणी करत आहेत, हे सांगत होतो. तेव्हा हा फोटो काढण्याात आला आहे, असं थरुर यांनी स्पष्ट केलं आहे.
This was when i told @girirajsinghbjp that a Department of Fisheries in a larger Ministry of Animal Husbandry is not the same as a Ministry of Fisheries, which @inCIndia & @RahulGandhi have rightly been asking for (& as i have done since 2014) https://t.co/NTOwVlYq4V
— Shashi Tharoor (@ShashiTharoor) March 10, 2021
(वाचा : राहुल गांधींची वचनपूर्ती, 12 वर्षांच्या मुलाला पाठवले स्पोर्ट्स शूज! )
राहुल गांधींनी केली होती मागणी
काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी काही दिवसांपूर्वी मत्स्यपालनासाठी वेगळं मंत्रालय स्थापन करण्याची मागणी केली होती. त्यावेळी भाजपाच्या अनेक नेत्यांनी राहुल यांच्यावर टीका केली होती. गिरीराज सिंह यांनी तर राहुल यांना पुन्हा शाळेत पाठवा अशी मागणी केली होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Shashi tharoor, Viral photo