नवी दिल्ली, 7 जुलै : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या मंत्रिमंडळात (Union Cabinet) फेरबदल करण्यात येत आहे. मंत्रिमंडळात नवीन चेहऱ्यांचा समावेश करण्याचा निर्णय नरेंद्र मोदींनी घेतला आणि त्यामुळे अनेक मंत्र्यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. मोदी सरकार 2.0 (Modi Government 2.0) मधील हा पहिलाच मंत्रिमंडळ विस्तार आहे. ज्या नवीन चेहऱ्यांना केंद्रीय मंत्रिमंडळात संधी देण्यात आली आहे त्यामध्ये महाराष्ट्रातील नारायण राणे, कपिल पाटील यांच्यासह एकूण चौघांचा समावेश आहे. या सर्व नेत्यांचा आता शपथविधी सोहळा राष्ट्रपती भवनात पार पडला.
मंत्रिमंडळ विस्तारात अनेक तरुण चेहऱ्यांनाही संधी दिली आहे. राष्ट्रपती भवनात मंत्रिमंडळ विस्तारानंतर आता शपथविधी सोहळा होत आहे. पाहूयात याच संदर्भातील सर्व updates
नारायण राणे यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
सर्बानंद सोनोवाल यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
डॉ. विरेंद्र कुमार यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
ज्योतिरादित्य शिंदे यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
रामचंद्र प्रसाद सिंग यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
अश्विनी वैष्णव यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
पशुपतीकुमार पारस यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
किरण रिजीजू यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
राजकुमार सिंग यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
हरदीप सिंग पुरी यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
मनसुख मांडविया यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
भूपेंदर यादव यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
पुरषोत्तम रुपाला यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
जी. किशन रेड्डी यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
अनुराग सिंग ठाकूर यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
पंकज चौधरी यांनी घेतली केंद्रीय मंत्रिपदाची शपथ
अनुप्रिया सिंह पटेल यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
सत्यपाल सिंह बघेल यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
राजीव चंद्रशेखर यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
शोभा करंदलजे यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
भानु प्रताप सिंह वर्मा यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
केंद्रीय मंत्रिमंडळात महाराष्ट्रातील चौघांचा समावेश
नारायण राणे
कपिल पाटील
डॉ भारती पवार
भागवत कराड
महाराष्ट्रातून दोन मंत्र्यांचे राजीनामे
प्रकाश जावडेकर
संजय धोत्रे
केंद्रीय मंत्रिमंडळातून 12 मंत्र्यांचा राजीनामा
प्रकाश जावडेकर
रवी शंकर प्रसाद
संतोष गंगवार
रमेश पोखरियाल निशांक
देबश्री चौधरी
प्रताप चंद्र सारंगी
बाबूल सुप्रियो
डॉ हर्षवर्धन
थावरचंद गेहलोत
रतन लाल कटारिया
संजय धोत्रे
एनडीएमधून शिवसेना आणि अकाली दलाने बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे या पक्षांना देण्यात आलेले मंत्रिपद हे रिक्त होते. यासोबतच केंद्रीय मंत्र्यांच्या निधनानंतरही मंत्रिपद हे रिक्तच होते. त्या सर्व जागांवर आता नवीन चेहरे देण्याचा निर्णय नरेंद्र मोदींनी घेतला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.