जाहिरात
मराठी बातम्या / देश / भारताचं मिसाईल हद्दीत येत असल्याचं माहीत असूनही पाकिस्तानने कारवाई का केली नाही? समजून घ्या कारण

भारताचं मिसाईल हद्दीत येत असल्याचं माहीत असूनही पाकिस्तानने कारवाई का केली नाही? समजून घ्या कारण

भारताचं मिसाईल हद्दीत येत असल्याचं माहीत असूनही पाकिस्तानने कारवाई का केली नाही? समजून घ्या कारण

कोणत्या मिसाइलने (missile) पाकिस्तानच्या हवाई क्षेत्राचं उल्लंघन केलं आहे, हे भारत किंवा पाकिस्तानने स्पष्ट केलेलं नाही. भारताकडून आलेल्या सुपरसॉनिक मिसाइलने आपल्या सीमेचं उल्लंघन केल्याचं पाकिस्तानने म्हटलं आहे.

  • -MIN READ Trending Desk
  • Last Updated :

    मुंबई, 14 मार्च: भारताचं एक सुपरसॉनिक मिसाईल (Supersonic Missile ) गुरुवारी (10 मार्च 22) पाकिस्तानच्या हद्दीत कोसळलं होतं. भारताच्या (India) या मिसाइलने त्यांच्या हवाई हद्दीचे उल्लंघन केलं असून, अनेक बिल्डिंगचं नुकसान केलं आहे, असं पाकिस्तानने (Pakistan) म्हटलंय. तर, भारतानेही या घटनेबद्दल खेद व्यक्त केला असून, नियमित देखभालीदरम्यान हे मिसाइल चुकून डागलं गेलं, असं म्हटलं होतं. दरम्यान, हे मिसाइल जेव्हा आमच्या हद्दीत आलं, तेव्हा आमचं हवाई दल त्यावर लक्ष ठेवून होतं, असं पाकिस्तानने म्हटलंय. त्यामुळे जर ते लक्ष ठेवून होते, तर त्यांनी त्या मिसाइलला पाडण्यासाठी कोणतीही कारवाई का केली नाही, असा प्रश्न उपस्थित होतो. नवी दिल्लीतील सेंटर फॉर एअर पॉवर स्टडीज (CAPS) थिंक टँकचे प्रमुख सेवानिवृत्त एअर मार्शल अनिल चोप्रा याबाबत म्हणाले, ‘ हे मिसाईल ज्या वेगाने पाकिस्तानच्या हद्दीत गेलं, त्या वेगाने त्यावर कारवाई करण्यासाठी पाकिस्तानला फारसा वेळ मिळाला नाही. ते इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना म्हणाले, ‘जेव्हा एखादी गोष्ट इतक्या वेगाने येत असेल, तेव्हा त्यावर कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया देणं तुमच्यासाठी सोपं नसतं. त्या मार्गावर मिसाइल आहे हेही तुम्हाला माहीत नसतं. त्यातच पाकिस्तान आणि भारतादरम्यान सध्या कोणताही तणाव नसून दोन्ही देशांसाठी हा शांततेचा काळ आहे. त्यामुळे पाकिस्तानला मिसाइल ओळखून ते पाडता आलं नाही.’ दरम्यान, कोणत्या मिसाइलने (missile) पाकिस्तानच्या हवाई क्षेत्राचं उल्लंघन केलं आहे, हे भारत किंवा पाकिस्तानने स्पष्ट केलेलं नाही. भारताकडून आलेल्या सुपरसॉनिक मिसाइलने आपल्या सीमेचं उल्लंघन केल्याचं पाकिस्तानने म्हटलं आहे. काही तज्ज्ञांचं असं मत आहे की जे मिसाइल पाकिस्तानमध्ये गेलं ते भारतातील ब्राह्मोस मिसाईल होतं. हे मिसाइल भारताने रशियाच्या मदतीने विकसित केलं आहे. या संदर्भात आज तकने वृत्त दिलंय. मिसाइल टेस्टिंगबाबत दोन्ही देशांमधील नियम 2005 मध्ये भारत आणि पाकिस्तानमध्ये बॅलेस्टिक मिसाईलच्या चाचणीबाबत करार झाला होता. करारानुसार, प्रत्येक देशाला बॅलेस्टिक मिसाईल चाचणीच्या किमान तीन दिवस आधी एकमेकांना सूचित करावं लागतं. हा करार सर्व प्रकारच्या मिसाईल चाचण्यांसाठी लागू आहे. करारानुसार, मिसाईलचं प्रक्षेपण, म्हणजेच ज्या ठिकाणाहून मिसाईल सोडलं जाणार आहे, ते ठिकाण दोन्ही देशांच्या सीमेपासून 40 किलोमीटर अंतरावर असलं पाहिजे. क्षेपणास्त्र नियंत्रण रेषा आणि आंतरराष्ट्रीय सीमेपासून 75 किमी अंतरावर सोडलं गेलं पाहिजे. हे नियम या कराराला अनुसरून पाळणं गरजेचं आहे मात्र, अशी कोणतीही माहिती भारताकडून देण्यात आली नसल्याचे पाकिस्तानने म्हटलं आहे. या घटनेवर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. “भारतीय मिसाईल पाकिस्तानमध्ये पडल्यानंतर आम्ही प्रत्युत्तर देऊ शकलो असतो, परंतु आम्ही संयम बाळगला,” असं रविवारी पाकिस्तानातील पंजाबमधल्या हाफिजाबाद जिल्ह्यात एका रॅलीला संबोधित करताना इम्रान खान म्हणाले होते.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात