जाहिरात
मराठी बातम्या / देश / Air india flight : एअर इंडियाच्या फ्लाईटमध्ये प्रवाशाच्या मोबाईलचा स्फोट, पुढं घडलं भयानक

Air india flight : एअर इंडियाच्या फ्लाईटमध्ये प्रवाशाच्या मोबाईलचा स्फोट, पुढं घडलं भयानक

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

Air india flight : एअर इंडियाच्या विमानात एका प्रवाशाच्या मोबाईलचा स्फोट झाला. यामुळे खळबळ उडाली. विमानाचे तातडीने इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले.

  • -MIN READ Rajasthan
  • Last Updated :

उदयपूर, 11 जुलै : गेल्या काही दिवसांत हवाई यात्रेदरम्यान काही चित्रविचित्र गोष्टी घडल्याचे पाहायला मिळाले. कधी प्रवाशांची फ्री स्टाईल हाणामारी तर कधी महिलेचा विनयभंग. मात्र, आता जी बातमी समोर आली आहे. त्याने खळबळ उडाली आहे. लेक सिटी उदयपूरमधून ही बातमी समोर आली आहे. एअर इंडियाच्या विमानात एका प्रवाशाच्या मोबाईलचा स्फोट झाला. यामुळे एकच गोंधळ उडाला. घटनेनंतर विमानाचे तातडीने इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. काय आहे प्रकरण? मिळालेल्या माहितीनुसार, मोबाईलमध्ये स्फोट झाल्याची ही घटना एअर इंडियाच्या फ्लाइट 470 मध्ये घडल्याचे सांगण्यात येत आहे. उदयपूरहून दिल्लीला उड्डाण केले होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, टेक ऑफ केल्यानंतर काही वेळातच एका प्रवाशाच्या मोबाईलच्या बॅटरीचा अचानक स्फोट झाला. प्रवाशाच्या मोबाईलमध्ये स्फोट झाल्याने प्रवासी घाबरले. त्यानंतर उड्डाणाचे पुन्हा उदयपूर विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. त्यानंतर 15 ते 20 प्रवासी विमानातून बाहेर पडले. त्या प्रवाशांनी फ्लाइटमध्ये चढण्यास नकार दिल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, नंतर तांत्रिक तपासणीनंतर विमान पुन्हा दिल्लीला पाठवण्यात आले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: air india
  • First Published :
जाहिरात
जाहिरात