श्रीनगर, 31 ऑक्टोबर: जम्मू-काश्मीरमधील (Jammu and Kashmir) राजौरी जिल्ह्यात (Rajouri district) नियंत्रण रेषेजवळ झालेल्या स्फोटात लष्कराचे दोन जवान शहीद झाले. अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. शनिवारी राजौरी जिल्ह्यात नियंत्रण रेषेपासून (एलओसी) सटी अग्रीम चौकीजवळ पेट्रोलिंगदरम्यान (patrolling) झालेल्या स्फोटात (explosion) दोन लष्करी जवान शहीद झाले. भारतीय लष्कराने सांगितले की, नौशेरा सेक्टरमध्ये लष्कराचे पथक पेट्रोलिंग करत होते, त्याचवेळी नियंत्रण रेषेजवळ हा स्फोट झाला. या स्फोटात एक लष्करी अधिकारी आणि एक जवान गंभीर जखमी झाले. दोघांनाही रुग्णालयात नेण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. हेही वाचा- धक्कादायक! लग्नाच्या कार्यक्रमात संगीत लावल्याने भडकले तालिबानी, 13 जणांची निर्घृण हत्या
भारतीय लष्कराने एका निवेदनात म्हटलं की, शहीद लेफ्टनंट ऋषी कुमार आणि शिपाई मनजीत सिंग हे शूर आणि त्यांच्या सेवेसाठी अत्यंत वचनबद्ध होते. कर्तव्य बजावताना त्यांनी देशासाठी सर्वोच्च बलिदान दिलं आहे. लष्कराच्या व्हाईट नाइट कॉर्प्सने (16 कॉर्प्स) ट्विटरवर सांगितलं की, “नौशेरा सेक्टरमध्ये पेट्रोलिंग करत असताना माइन स्फोट झाला. या स्फोटात आणखी एक जवान जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
दोन्ही जवानांचा फोटो शेअर करताना 16 कॉर्प्सनं लिहिलं की, “व्हाइट नाइट कॉर्प्स आणि लष्कराच्या सर्व रँक शूर लेफ्टनंट ऋषी कुमार आणि शिपाई मनजीत सिंग यांना सलाम करतात. ज्यांनी नौशेरा सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेजवळ कर्तव्य बजावताना सर्वोच्च बलिदान दिलं आहे. सैन्य त्यांच्या कुटुंबियांप्रती शोक व्यक्त करते.
#GOC #WhiteKnight_IA and all ranks salute bravehearts Lt Rishi Kumar and Sep Manjit Singh, who made the supreme sacrifice in line of duty along the Line of Control in Naushera sector on 30 Oct 21 and offer deep condolences to their families.@adgpi@NorthernComd_IA pic.twitter.com/qvEiwCEfzd
— White Knight Corps (@Whiteknight_IA) October 30, 2021
लेफ्टनंट ऋषी कुमार हे बिहारमधील बेगुसराय जिल्ह्यातील रहिवासी होते. दुसरीकडे, शिपाई मनजीत सिंग हे पंजाबमधील भटिंडा येथील रहिवासी होते. जम्मू-काश्मीरचे लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांनी शहीद जवानांना श्रद्धांजली वाहिली आणि जखमी जवानाला लवकरात लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या. सिन्हा यांनी ट्विट केलं की, “नौशेरा सेक्टरमध्ये भारतीय सीमेचे रक्षण करताना शहीद झालेले लष्कराचे लेफ्टनंट ऋषी कुमार आणि शिपाई मनजीत सिंग यांच्या अदम्य साहसाला माझी श्रद्धांजली. शहीदांच्या कुटुंबियांबद्दल माझ्या मनापासून संवेदना. जखमी जवान लवकरात लवकर बरा व्हावा यासाठी मी प्रार्थना करतो.” पुंछमध्ये सर्च ऑपरेशन दरम्यान 9 जवान शहीद याआधी, जम्मू-काश्मीरच्या पुंछ आणि राजौरी या दोन सीमावर्ती जिल्ह्यांमध्ये लपलेल्या दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या मोठ्या शोध मोहिमेदरम्यान 9 जवान शहीद झाले होते. पूंछच्या सुरनकोट जंगलात कारवाईच्या पहिल्याच दिवशी लष्कराचे पाच जवान शहीद झाले होते, तर 14 ऑक्टोबरला मेंढरच्या भट्टी दरियान भागात अन्य चार जवान शहीद झाले होते.