राज्यसभेच्या पोटनिवडणुकीत ट्विस्ट; सुशील मोदींविरोधात निवडणुकीच्या रिंगणात इंजिनिअर उमेदवार

राज्यसभेच्या पोटनिवडणुकीत ट्विस्ट; सुशील मोदींविरोधात निवडणुकीच्या रिंगणात इंजिनिअर उमेदवार

राम विलास पासवान यांच्या निधनानंतर कोणाला मिळणार जागा? सुशील मोदींविरोधात इंजिनिअर उमेदवाराची लढत पाहायला मिळणार आहे.

  • Share this:

पाटणा, 3 डिसेंबर : माजी केंद्रीय मंत्री राम विलास पासवान (Ram Vilas Paswan) यांच्या निधनानंतर रिकाम्या राज्यसभा सीटसाठी होत असलेल्या पोटनिवडणुकीत एनडीएचे उमेदवार आणि माजी उप मुख्यमंत्री सुशील कुमार मोदी ( Sushil Kumar Modi) आता कदाचित  निवडणुकीत निर्विरोध जिंकून येऊ शकणार नाहीत. महाआघाडीकडून कोणताही उमेदवार देणार नसल्याचे सांगितल्यानंतर आता एका व्यक्तीने नाव दाखल केलं आहे. सुशील मोदी यांना टक्कर देण्यासाठी व्यवसायाने इंजिनीअर असलेली ही व्यक्ती पुढे आली आहे. अर्थातच, जर त्यांची उमेदवारी योग्य वाटली तर या वेळी राज्यसभा पोटनिवडणुकीत एक रंजक स्पर्धा पाहायला मिळेल.

निवडणूक आयोगाकडून मिळालेल्या माहितीनुसार, अपक्ष उमेदवार श्याम नंदन प्रसाद यांनीही बुधवारी एका सेटमध्ये अर्ज दाखल केला आहे. उमेदवारीसाठी आवश्यक असलेल्या 10 आमदारांचं समर्थन असलेलं पत्र त्यांनी दिले नसले तरी येत्या काळात महाआघाडीकडून त्यांना पाठिंबा मिळेल का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

श्याम नंदन प्रसाद साधारण 2 वाजता उमेदवारी दाखल करण्यासाठी पाटणा विभागीय आयुक्त कार्यालयात पोहोचले. ते म्हणाले की, समाज सेवा करण्यासाठी राजकारणात आलो आहे. यापूर्वी त्यांनी 2014 मध्ये पाटणा साहेब लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली आहे.

10 आमदारांनी दिलेल्या समर्थनावर ते म्हणाले की, या संदर्भात ते एनडीए आणि महायुतीच्या आमदारांशी चर्चा करतील आणि गुरुवारी निवडणूक अधिकारी कार्यालयाला समर्थनाचं पत्र पाठवतील. उमेदवारी दिल्यानंतर श्यामंदन प्रसाद यांनी सांगितलं की ते इंजिनीअर म्हणून काम करीत होते. आज नामनिर्देशनाचा शेवटचा दिवस असला तरी अशा परिस्थितीत निवडणूक आयोग उद्या तांत्रिक आधारावर पाठिंब्याचे पत्र घेईल की नाही हे पाहावे लागेल. उद्या 4 डिसेंबरपर्यंत नावे मागे घेण्याची शेवटची तारीख आहे आणि 5 डिसेंबर रोजी उमेदवारी पत्राची छाननी केली जाईल.

Published by: Meenal Gangurde
First published: December 3, 2020, 4:14 PM IST

ताज्या बातम्या