ट्रकचा टायर बदलण्यासाठी खाली उतरला आणि झाला भयंकर स्फोट, चालकाचा मृत्यू

ट्रकचा टायर बदलण्यासाठी खाली उतरला आणि झाला भयंकर स्फोट, चालकाचा मृत्यू

ट्रकचा टायर खराब झाला म्हणून खाली उतरलेल्या तरुणाला आपल्यासमोर मृत्यू उभा असल्याची पुसटशी देखील कल्पना नव्हती.

  • Share this:

पानीपत, 24 डिसेंबर : ट्रकचा टायर खराब झाला म्हणून खाली उतरलेल्या तरुणाला आपल्यासमोर मृत्यू उभा असल्याची पुसटशी देखील कल्पना नव्हती. ट्रकचा टायर बदलताना अचानक स्फोट झाला आणि चालक हवेत उडाला. या चालकाचा दुसऱ्या ट्रकवर आदळून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे.

हरियाणातील पानीपत जिल्ह्यातील गोहाना गावात ही धक्कादायक घटना समोर आली. 40 वर्षीय विनोद कुमार गेल्या सहा महिन्यांपासून राजबीर सिह यांच्याकडे ट्रक ड्रायव्हर म्हणून काम करत होता. बुधवारी विनोद रिफायनरीमधून ट्रक भरल्यानंतर विनोद शहरात पोहोचला. त्याच दरम्यान ट्रकच्या चाकात काहीतरी बिघाड झाल्याचं लक्षात आलं आणि तो टायर बदलण्यासाठी खाली उतरला.

स्टेपनीच्या मदतीनं विनोदने टायर बदलला आणि स्टेपच्या सहाय्यानं टायर बदलणार एवढ्या स्फोटाचा मोठा आवाज झाला आणि आग लागली. या स्फोटामुळे चालक उडून दुसऱ्या ट्रकवर आदळला आणि त्याच्या जागीच मृत्यू झाला आहे. या स्फोटात टायर फुटला आहे.

हा स्फोट इतका भयंकर होता की त्याचा आवाज काही किलोमीटर दूरपर्यंत पसरला होता. आसपासच्या लोकांनी पाहिले की विनोदचे दोन्ही पाय रक्तबंबाळ झाले आहेत आणि तो बेशुद्ध आहे. लोकांनी या अपघाताची माहिती पोलिसांना कळवली आणि पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत ट्रक चालकाला रुग्णालयात दाखल केलं. डॉक्टरांनी ट्रक चालकाला मृत घोषित केलं आहे.

Published by: Kranti Kanetkar
First published: December 24, 2020, 10:55 AM IST

ताज्या बातम्या