जाहिरात
मराठी बातम्या / देश / ‘रिपब्लिक’ने केला गोपनीय माहितीचा दुरुपयोग आणि विपर्यास, BARCने व्यक्त केली तीव्र नाराजी

‘रिपब्लिक’ने केला गोपनीय माहितीचा दुरुपयोग आणि विपर्यास, BARCने व्यक्त केली तीव्र नाराजी

‘रिपब्लिक’ने केला गोपनीय माहितीचा दुरुपयोग आणि विपर्यास, BARCने व्यक्त केली तीव्र नाराजी

काही दिवसांपूर्वीच मुंबई पोलिसांनी टीआरपी घोटाळा उघड करत तीन चॅनल्सना जबाबदार धरलं होतं. त्यात रिपब्लिक वाहिनीचाही समावेश होता.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली18 ऑक्टोबर: ‘रिपब्लिक’ या वृत्तवाहिनीने (Republic network) खासगी संभाषण आणि ई-मेल संवादातली गोपनीय माहिती उघड केली आणि त्याचा दुरुपयोग करत विपर्यास केला असं  Audience Research Council (BARC) ने म्हटलं आहे. याप्रकरणी BARCने तीव्र  नाराजी व्यक्त केली आहे. याबाबत पत्र काढून BARCने आपली भूमिका स्पष्ट केली. याबाबत BARCने रविवारी काढलेल्या पत्रकात म्हटलं आहे की, टिआरपी घोटाळ्याबाबत सध्या मुंबई पोलीस चौकशी करत आहे. चौकशी सुरू असल्याने BARC त्याबद्दल कुठलीही प्रतिक्रिया व्यक्त करत नाही. चौकशी संस्थाना BARC सहकार्य आणि मदत करत असल्याचंही त्यांनी पत्रकात म्हटलं आहे. खासगी संभाषण आणि ईमेल्सच्या माध्यमातून जो गोपनीय संवाद झाला होता त्याचा दुरूपयोग करत त्याचं चुकीच्या पद्धतीने सादरीकरण करणं हे योग्य नाही. त्याबद्दल आम्ही तीव्र नापसंती आणि नाराजी व्यक्त करत आहोत. अशी कृती करणं हे व्यवसाय मुल्यांशी प्रतारणा केल्यासारखं आहे असं BARCने पत्रकात म्हटलं आहे. या प्रकरणी जी चौकशी सुरू आहे त्यावर आम्हाला कुठलही मत व्यक्त करायचं नाही याचा पुनरुच्चारही BARCने पत्रकात केला आहे. BARCसोबत ई-मेलव्दारे जो संवाद झाला त्यातली माहिती ही मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपांना छेद देणारी आहे असा दावा ‘रिपब्लिक’ने केला होता. त्यानंतर चर्चा सुरू झाल्याने BARCने आज हे स्पष्टिकरण दिलं आहे. काही दिवसांपूर्वीच मुंबई पोलिसांनी टीआरपी घोटाळा उघड करत तीन चॅनल्सना जबाबदार धरलं होतं. त्यात रिपब्लिक वाहिनीचाही समावेश होता.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात