जाहिरात
मराठी बातम्या / देश / त्यांना सन्मानानं वागवा, भारतीय पायलटच्या बाजूनं पाकिस्तानी जनतेचा आवाज

त्यांना सन्मानानं वागवा, भारतीय पायलटच्या बाजूनं पाकिस्तानी जनतेचा आवाज

त्यांना सन्मानानं वागवा, भारतीय पायलटच्या बाजूनं पाकिस्तानी जनतेचा आवाज

त्या पायलटचा व्हिडिओ पाकिस्ताननंच मुद्दाम रिलीज केला. त्यानंतर पाकिस्तानमधूनच अनेकांनी त्याला चांगली वागणूक द्या, सन्मानानं वागवा, असं ट्वविट केलंय.

  • -MIN READ
  • Last Updated :

    नवी दिल्ली, 27 फेब्रुवारी : भारत आणि पाकिस्तानमधल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर परराष्ट्रमंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. पाकिस्तानचे सर्व दावे फेटाळून लावत त्यांनी भारताने पाकिस्तानचे एक लढाऊ विमान पाडल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. पण त्यांनी पायलट मिसिंग असल्याचं सांगितलं. तर पाकिस्ताननं आपल्या ताब्यात दोन भारतीय पायलट असल्याचं सांगितलंय. त्या पायलटचा व्हिडिओ पाकिस्ताननंच मुद्दाम रिलीज केला. त्यानंतर पाकिस्तानमधूनच अनेकांनी त्याला चांगली वागणूक द्या, सन्मानानं वागवा, असं ट्वविट केलंय. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान बेनझीर भुत्तो यांची पुतणी फातिमा भुत्तो यांनी ट्विट करून त्या पायलटसाठी प्रार्थना केलीय. त्यांना सन्मानानं वागवा,असं सांगितलंय. त्या म्हणाल्या, ’ पाकिस्तानमधून अनेकांचं असं म्हणणं आहे की त्या पायलटना सन्मानानं वागवा. कसलीही भीती न बाळगता तुम्ही असं वागवाल, तर मला नक्कीच अभिमान वाटेल. आपल्याला युद्ध नकोय. मग सर्वांसाठीच सन्मान, शांतता, समोपचार बाळगायला हवा. '

    जाहिरात
    जाहिरात
    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात