चमोली, 19 जुलै : ट्रान्सफॉर्मरमध्ये ब्लॉस होऊन मोठी दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेमध्ये 10 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. तर अनेक जण जखमी झाले आहेत. ही धक्कादायक घटना उत्तराखंडमध्ये चमोली शहरातील सीवर ट्रीटमेंट प्लांटजवळ घडल्याची माहिती मिळाली आहे. चमोलीचे एसपी परमेंद्र डोवाल यांनी या घटनेला दुजोरा दिला आहे. चमोली शहरातील अलकनंदा नदीजवळ ही घटना उघडकीस आली आहे. प्रथम ट्रान्सफॉर्मरमध्ये स्फोट झाला आणि नंतर लोक त्यात अडकल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेत आतापर्यंत 10 जणांचा मृत्यू झाला आहे. उत्तराखंडमध्ये तुफान वादळी वाऱ्यासह पाऊस सुरू आहे. या स्फोटाची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले आहेत.
Uttarakhand | 10 people died and several injured after a transformer exploded on the banks of the Alaknanda River in the Chamoli district. Injured have been admitted to the district hospital: SP Chamoli Parmendra Doval
— ANI (@ANI) July 19, 2023
राज्याचे एडीजीपी व्ही मुरुगेसन यांनी दिलेल्या माहितीनुसार नमामि गंगा प्रकल्पावर काम सुरू आहे. तिथे ही मोठी दुर्घटना घडली. मृतांमध्ये एक पोलीस उपनिरीक्षक आणि 3 होमगार्ड कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. या घटनेच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.
एसपी परमेंद्र डोवाल यांच्या म्हणण्यानुसार अलकंदन नदीच्या काठावर असलेल्या ट्रान्सफॉर्मरमध्ये स्फोट झाला. जखमींना जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. तर दुसरीकडे लोकांनी ऊर्जा महामंडळावर निष्काळजीपणाचा आरोप करत कारवाईची मागणी केली आहे.