मुंबई, 26 जून: यंदाचं वर्ष अक्षयसाठी खास असून एकाच वेळी तो विविध प्रोजेक्ट्सवर काम करत आहे. ‘सुर्यवंशी’प्रमाणेच तो ‘हाऊसफुल 4’ या चित्रपटामध्येही झळकणार आहे. त्यामुळेच त्याला या दोन्ही चित्रपटांना वेळ देणं गरजेचं आहे. विशेष म्हणजे या दोन्ही चित्रपटांच्या डेट्स सांभाळत तो त्याचं चित्रीकरण पूर्ण करत आहे. ‘सुर्यवंशी’चं चित्रीकरण सुरु असताना त्याला ‘हाऊसफुल 4’साठी थोडासा वेळ काढावा लागला. ‘हाऊसफुल 4’ मधील एका गाण्याचं चित्रीकरण पूर्ण करण्यासाठी अक्षयला ‘सुर्यवंशी’मधून 2 दिवसांचा ब्रेक घ्यावा लागला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.