Home /News /national /

Toolkit Case: पुराव्याअभावी दिशा रवीला सशर्त जामीन मंजूर, न्यायाधीशांनी दिला ऋग्वेदातला संदर्भ

Toolkit Case: पुराव्याअभावी दिशा रवीला सशर्त जामीन मंजूर, न्यायाधीशांनी दिला ऋग्वेदातला संदर्भ

शेतकरी आंदोलन प्रकरणी Toolkit फेरफार केल्याचा आरोप असणाऱ्या दिशा रवीला अखेर कोर्टाने मोठा दिलासा दिला. 'कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नसलेल्या 22 वर्षीय मुलीला तुरुंगात ठेवायचं काहीही कारण नाही', असं म्हणत कोर्टाने थेट ऋग्वेदाचाही उल्लेख केला.

पुढे वाचा ...
    नवी दिल्ली, 23 फेब्रुवारी: शेतकरी आंदोलनासंबंधित (Farmer Protest) पर्यावरण कार्यकर्ती  ग्रेटा थनबर्गने (Greta Thunberg) ट्वीट केलेल्या टूलकिटचं (Toolkit case) संपादन केल्याप्रकरणी पर्यावरण कार्यकर्ती दिशा रवीला (Climate activist Disha Ravi) अखेर जामीन मंजूर (Bail) करण्यात आला आहे. दिल्लीच्या पटियाला हाऊस न्यायालयाने मंगळवारी 1 लाख रुपयांच्या बॉंडवर सशर्त जामीन मंजूर केला आहे. तिला 13 फेब्रुवारी अटक करण्यात आली होती. अटकेच्या 9 दिवसांनंतर 22 वर्षीय दिशा रवीला जामीन देण्यात आला आहे. या प्रकरणी कोर्टाने नेमकं काय सांगितलं हे जाणून घेणं महत्त्वाचं ठरेल. यावेळी दिल्ली पोलिसांनी न्यायालयात सांगितलं की, दिशा रवीने टूलकिट संबंधित सर्व पुरावे नष्ट केली आहेत. यावेळी दिशा रवीने आपली बाजू मांडताना सांगितलं की, शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देणं, हा जर देशद्रोह असेल तर मला तुरुंगातच ठेवा. यावेळी न्यायमूर्ती धर्मेंद्र राणा यांनी दिशा रवीला जामीन देताना म्हणाले की, “या प्रकरणात पोलिसांकडील अपूर्ण पुरावे लक्षात घेता, कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नसलेल्या 22 वर्षीय मुलीला तुरुंगात ठेवायचं काहीही कारण नाही.' न्यायालयाने दिशा रवीला जामीन देताना ऋग्वेदाचा देखील उल्लेख केला आहे. यावेळी न्यायाधीश म्हणाले, 'आ नो भद्रः क्रतवो यंतु विश्वतो दब्धसो अपरीतास उद्भिद:' याचा अर्थ असा होतो की, 'आमच्याकडे चहू बाजूंनी असे कल्याणकारी विचार येतात, जे कोणाच्याही दबाबाला बळी पडत नाहीत. तसेच कोणीही बाधित करत नाहीत. त्यामुळे असे अज्ञात विषय प्रकट करणारे विचार येथे येऊ नयेत.' हे ही वाचा-Toolkit Case: मंदिरासाठी जर मी दरोडेखोरांकडून देगणी घेतली, तर मीही दरोड्यात सामी Whatsapp ग्रूप बनवणं गुन्हा नाही पुढे न्यायालयाने असंही म्हटलं की, Whatsapp ग्रुप बनवणं, टूलकिट संपादन करणं हा मुळात अपराध नाही. केवळ वॉट्सअॅप चॅट डिलीट केल्यामुळे तिचा पोएटिक जस्टीस फाऊंडेशनशी संबंध जोडणं योग्य नाही. तिचा फुटीरतावाद्यांशी संबंध असल्याचा एकही पुरावा आतापर्यंत समोर आला नाही. तसेच 26 जानेवारीला शांतनुने दिल्लीत येणं, हा काही गुन्हा होऊ शकत नाही, असंही न्यायालयाने म्हटलं आहे. टूलकिट आणि 26 जानेवारी रोजी लाल किल्ल्यावर झालेला हिंसाचार याचा संबंध स्पष्ट करणारा काही पुरावा आहे का? अशी विचारणाही न्यायालयाने दिल्ली पोलिसांकडे केली होती.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Farmer protest, Greta Thunberg, Protesting farmers

    पुढील बातम्या