नवी दिल्ली, 14 जुलै : देशात टोमॅटोच्या किमती कधी कमी होणार, असाच सवाल सर्वत्र विचारला जात आहे. दररोज वाढणाऱ्या किमतीमध्ये सर्वसामान्यांचं बजेट कोलमडलं आहे. दुसरीकडे सरकारकडून टोमॅटोचे दर कमी करण्यासाठी प्रयत्न सुरू असले तरी टोमॅटोचे दर काही कमी होताना दिसत नाहीत. महाराष्ट्रात टोमॅटोच्या किमती १५० ते १६० रुपये किलोने विकला जात आहे. चंदीगडमध्ये तर टोमॅटोची किंमत ३५० रुपये किलोपर्यंत पोहोचली आहे. याशिवाय दिल्लीजवळी गाजियाबाद भागात याची किंमत २५० रुपये किलो आहे. सरकारी प्रयत्नांनंतरही भाव काही कमी होईना सर्वात आधी टोमॅटोच्या भाववाढीबद्दल सांगायचं झालं तर त्यावर नियंत्रण आणण्यासाठी सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत. यासाठी सरकारने टोमॅटो ग्रँड चॅलेंजची सुरुवातही केली होती. यानंतर दिल्ली एनसीआरच्या नागरिकांना दिलासा मिळावा म्हणून एक दिवस आधी नवा प्लानही तयार केला होता. याअंतर्गत कन्ज्यूमर अफेयर मिनिस्ट्रीकडून नाफेड आणि एनसीसीएफला दुसऱ्या राज्यातून टोमॅटो खरेदी करणे आणि स्वस्तात दिल्ली-एनसीआरमध्ये विकण्याचे निर्देश दिले आहेत. तरीही टोमॅटोच्या किमती चढ्याच आहेत. Tomato Price Hike : टोमॅटोच्या दरवाढीचा राजधानी मुंबईला फटका, प्रसिद्ध वडापाव झाला बंद पावसाने रडवलं अन् टोमॅटोनेही… उत्तर भारतात सातत्याने जोरदार पाऊस सुरू आहे. अनेक ठिकाणी पाणी साचल्यामुळे घराच्या बाहेर निघणं कठीण झालं आहे. भाज्यांच्या किमतीही वाढल्या असून सर्वसामान्याच्या खिशाला फटका सहन करावा लागत आहे. चंदीगडमध्ये टोमॅटोच्या किमती ३०० रुपयांच्या पार गेले आहेत. त्यामुळे टोमॅटोच्या खरेदीचं प्रमाणही कमी झालं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.