मराठी बातम्या /बातम्या /देश /मोदींनी मंत्रिमंडळातून बेदखल केलेल्या खासदाराने भाजपला ठोकला राम-राम; या पक्षात प्रवेश

मोदींनी मंत्रिमंडळातून बेदखल केलेल्या खासदाराने भाजपला ठोकला राम-राम; या पक्षात प्रवेश

आज तृणमूलचे राष्ट्रीय सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी आणि आरएस खासदार डेरेक ओब्रायन यांच्या उपस्थितीत बाबूल सुप्रियो तृणमूल (Babul Supriyo joined Trinamool congress party) पक्षात दाखल झाले.

आज तृणमूलचे राष्ट्रीय सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी आणि आरएस खासदार डेरेक ओब्रायन यांच्या उपस्थितीत बाबूल सुप्रियो तृणमूल (Babul Supriyo joined Trinamool congress party) पक्षात दाखल झाले.

आज तृणमूलचे राष्ट्रीय सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी आणि आरएस खासदार डेरेक ओब्रायन यांच्या उपस्थितीत बाबूल सुप्रियो तृणमूल (Babul Supriyo joined Trinamool congress party) पक्षात दाखल झाले.

कोलकाता, 18 सप्टेंबर : केंद्रीय मंत्रिपदावरून (union minister) नुकतेच पायउतार झालेले भाजप खासदार आणि गायक बाबुल सुप्रियो (Babul Supriyo) यांनी आज तृणमूल काँग्रेस पक्षात प्रवेश केला. त्यांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा दिला होता. त्यामुळे ते राजकारणातून संन्यास घेणार असे बोलले जात होते. मात्र, आज तृणमूलचे राष्ट्रीय सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी आणि आरएस खासदार डेरेक ओब्रायन यांच्या उपस्थितीत बाबूल सुप्रियो तृणमूल (Babul Supriyo joined Trinamool congress party) पक्षात दाखल झाले.

तृणमूल काँग्रेस पक्षाकडून त्यांचे स्वागत करण्यात आले असून त्याच्या पक्षप्रवेशाबाबत समाधान व्यक्त करण्यात आले आहे. पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेसला मिळालेल्या घवघवीत यशामुळं पक्षातून बाहेर पडलेल्या नेत्यांसह अनेक नेते तृणमूलमध्ये जाण्यास इच्छुक आहेत. भाजपकडून खासदारकीचा राजीनामा देत आता तृणमूलमध्ये दाखल झाल्यानं पश्चिम बंगालमध्ये भाजपला हा मोठा फटका बसला आहे.

‘तृणमूल’ला होती प्रतीक्षा

बाबुल सुप्रियो यांच्यासारखा केंद्रीय मंत्री राहिलेला नेता आपल्या पक्षात यावा, यासाठी तृणमूल काँग्रेसकडूनही प्रयत्न सुरू होते. सुप्रियो यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागल्यानंतर तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकारवर टीका केली होती.

हे वाचा - BREAKING: पॉर्नोग्रॅफी प्रकरणानंतर मनी लाँड्रिंगमध्येही अडकणार राज कुंद्रा, EDने दाखल केला गुन्हा

मंत्री पद सोडायला लागल्यानंतर भावनिक पोस्ट

बाबुल सुप्रियो अवघ्या 6 वर्षांपूर्वी ज्या नाट्यमय पद्धतीने राजकारणात आले आणि बघता बघता केंद्रीय मंत्री झाले, त्याच वेगानं ते राजकीय प्रवाहातून बाहेर पडू शकतात, असं त्यांच्या नातेवाईकांचं म्हणणं होतं. त्याप्रमाणे खासदारकीचा राजीनामा देताना बाबूल यांनी एक भावनिक पोस्ट बंगालीमध्ये लिहीत आपण हे क्षेत्रच सोडत असल्याचं म्हटलं होतं. मंत्रिपदाचा राजीनामा द्यायला लागल्यानंतर बाबुल सुप्रियो यांचा सार्वजनिक वावर कमी झाला होता. मात्र, आता त्यांनी तृणमूलमध्ये प्रवेश करून आपला राजकीय संन्यास नसल्याचे दर्शवले आहे.

First published:

Tags: West bangal, West Bengal bjp