नोएडा, 10 मार्च : परीक्षेच्या तणावामुळे अनेक विद्यार्थी आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलत आपलं जीवन संपवतात. अलीकडेच राजस्थानच्या दौसा जिल्ह्यात दहावीचा निकाल लागण्यापूर्वीच एका विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची घटना समोर आली होती. तिने एक सुसाइड नोटही लिहिली होती, जी सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. असा प्रश्न पडतो की, परीक्षेचा काळ इतका तणावपूर्ण आहे का? आणि तो असला तरी काय करायचे, जेणेकरून देशाच्या मुलांना जीव द्यावा लागू नये? तर नोएडा येथील रहिवासी देवेंद्र शर्मा आणि त्यांची मुलगी मानवी शर्मा यांनी मिळून यावर उपाय शोधण्याचा प्रयत्न केला आहे. काय आहे तो उपाय, हे जाणून घेऊयात. मानवी शर्मा एका खासगी शाळेत चौथीच्या वर्गात शिकते. तिने “रोबोट सिटी आणि कॅट स्टोरी” लिहिली आहे. ती म्हणते की, हे पुस्तक मी परीक्षेच्या वेळी लिहिले होते. मी असे अनेक कार्यक्रम पाहिले आणि रोबोट्सबद्दलची पुस्तके वाचली. तिथून मी कल्पना घेतली. त्यानंतर मी लिहायला सुरुवात केली. माझ्या पालकांनीही मला लिहण्यात मदत केली.
गळ्यात गेलं नाणं पण… डॉक्टरने वाचवला आतापर्यंत 112 मुलांचा जीव VIDEO मानवी शर्माचे वडील देवेंद्र शर्मा सांगतात की, विद्यार्थ्यांवर परीक्षेच्या काळात दडपण असते, त्यांना वाटते की परीक्षेत चांगली कामगिरी करता आली नाही तर काय होईल. यानंतर परीक्षा संपली की रिकामा वेळ असतो आणि फक्त परीक्षेच्या निकालाचे दडपण असते. अशा परिस्थितीत मुलाचे मन कोणत्या ना कोणत्या कामात व्यस्त असणे आवश्यक आहे. म्हणूनच मी मानवीला कलेकडे वळवण्याचा प्रयत्न केला आहे, ज्यामुळे तिच्याकडे रिकामा वेळ राहू नये आणि कोणतीही अप्रिय गोष्ट तिच्या मनात येऊ नये. 25 पानांचे हे पुस्तक एका खासगी प्रकाशन संस्थेने प्रकाशित केले आहे, असे देवेंद्र सांगतात. आता ते अॅमेझॉनवर ऑनलाइनही उपलब्ध आहे.