मराठी बातम्या /बातम्या /देश /बाळासाठी `ही` व्यक्ती रोज दहा किलोमीटरवरून आणत होती दूध; मंत्री महोदयांनी अडचणच सोडवली!

बाळासाठी `ही` व्यक्ती रोज दहा किलोमीटरवरून आणत होती दूध; मंत्री महोदयांनी अडचणच सोडवली!

मंत्री महोदयांनी सोडवली अडचण

मंत्री महोदयांनी सोडवली अडचण

मंत्री महोदयांनी या कुटुंबाची अडचणच सोडवली आहे.

  • Local18
  • Last Updated :
  • Adilabad, India

    आदिलाबाद, 24 मार्च : एका कुटुंबाने अर्भकासाठी दुधाची व्यवस्था करण्याची विनंती केली; पण अधिकाऱ्यांनी या विनंतीकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे तेलंगण राज्याचे अर्थमंत्री टी. हरिश राव यांनी अधिकाऱ्यांना तातडीने कार्यवाही करण्यास भाग पाडले आणि गायीची व्यवस्था करावी, अशी सूचना अधिकाऱ्यांना केली. ही नुकतीच घडलेली घटना सोशल मीडियावर व्हायरल झाली. मंत्र्यांनी तात्काळ प्रतिसाद दिल्याने नेटकऱ्यांनी त्यांचं विशेष कौतुक केलं आहे.

    याबाबत अधिक माहिती अशी, जंगाबाबू आणि कोडाप्पा पारूबाई हे जोडपं तेलंगणच्या आदिलाबाद जिल्ह्याच्या इंद्रवेल्ली मंडलातल्या राजूगुडा या दुर्गम गावात राहतं. पारूबाई यांनी या वर्षी जानेवारी महिन्यात इंद्रवेल्लीच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात एका मुलीला जन्म दिला. दुसऱ्या दिवशी कुटुंबीयांनी पारूबाई आणि त्यांच्या बाळाला मूळ गावी आणलं; मात्र प्रकृती अस्वाथ्यामुळे पारूबाई यांचा दहा दिवसांनी मृत्यू झाला. बाळाच्या आहाराची जबाबदारी आजोबा बापूराव आणि जंगाबाबू यांच्यावर होती. ज्या दुर्गम खेड्यात हे कुटुंब राहतं, तिथे बाळाच्या दुधासाठी एकही शेळी किंवा गाय नाही.

    गावात दुधाच्या पिशव्या येत नसल्याने त्यांना दुधाची पिशवी आणण्यासाठी रोज 10 किलोमीटर पायी किंवा खासगी वाहनाने जावं लागत असे. त्यांनी एक महिन्यापूर्वी एकात्मिक आदिवासी विकास प्राधिकरणाच्या एका अधिकाऱ्याकडे बाळाच्या दुधाच्या सोयीसाठी एक गाय मंजूर करण्याची विनंती केली होती. त्यांनी या संदर्भात अर्जदेखील दाखल केला होता; मात्र मागणी करूनही गाय मंजूर होत नसल्याने हे कुटुंब निराश होतं.

    80 हजार झाडं लावली, आपली पगारातून या शिक्षकाने शाळेचं चित्रच पालटलं, हे ‘गुरु द्रोण’ कोण?

    हा मुद्दा अर्थमंत्री हरिश राव यांच्या निदर्शनास आला. त्यांच्या सूचनेनुसार, जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कर्मचाऱ्यांनी बाळाची तपासणी करून तिच्यासाठी कुटुंबीयांना दूध पिशव्या आणि पौष्टिक अन्नाची पाकिटं दिली. कर्मचाऱ्यांनी बाळाच्या प्रकृतीची तपासणी केली. बाळाचे वडील जंगाबाबू यांच्या इच्छेनुसार, या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी त्यांनी एक गाय खरेदी केली आणि त्यांच्याकडे सुपूर्द केली.

    मंत्री हरीश राव यांनी वेळीच प्रतिसाद दिल्याबद्दल आणि गाय दिल्याबद्दल या कुटुंबाने त्यांचे आभार मानले. ते म्हणाले, `आता आम्ही बाळाचं संगोपन उत्तम रीतीने करू. मंत्र्यांनी दिलेली गाय ही आमच्यासाठी एक उत्तम भेट आहे.` ही बातमी सोशल मीडियावर व्हायरल झाली. मंत्र्यांनी वेळीच प्रतिसाद दिल्याने एका बाळाचा जीव वाचल्याचं समजताच नेटकऱ्यांनी त्यांचं कौतुक केलं.

    First published:
    top videos

      Tags: Local18, Telangana