अयोध्या/नवी दिल्ली, 6 ऑगस्ट : रामाची नगरी अयोध्येत अनेक वर्षांनंतर राममंदिर उभारणीसाठी केलेल्या भूमिपूजनाच्या एक दिवसानंतर ऑल इंडिया इमाम असोसिएशनच्या अध्यक्षांनी भडकाऊ वक्तव्य केलं आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राममंदिराचं भूमिपूजन आणि शिलान्यास केल्यानंतर असोसिएशनचे अध्यक्ष मोहम्मद साजिद राशिदी यांनी मंदिरात तोडफोड करण्याची धमकी दिली आहे. ते म्हणाले, विवादीत ठिकाणावर कधी मंदिर नव्हतेच, तेथे बाबरी मशीद होती आणि राहिल.
वृत्तसंस्था एएनआयने मोहम्मद साजिद राशिदीचं हे वक्तव्य ट्विट केलं आहे. एएनआयने दिलेल्या माहितीनुसार, राशिदीने सांगितले की इस्लाम सांगतं की एक मशीद नेहमीच एक मशीद राहिलं. याला काही दुसऱं तयार करण्यासाठी तोडता येऊ शकत नाही. आमचा विश्वास आहे की ती एक मशीद होती आणि नेहमीच एक मशिदच राहिलं. मशीद बांधण्यासाठी मंदिर उद्धवस्त करण्यात आलं नव्हतं. पण आता मशीद उभारणीसाठी मंदिर तोंडण्यात येऊ शकतं.
Islam says a mosque will always be a mosque. It can't be broken to build something else. We believe it was, and always will be a mosque. Mosque wasn't built after demolishing temple but now maybe temple will be demolished to build mosque: Sajid Rashidi, Pres, All India Imam Assn pic.twitter.com/DzlbYQ3qdm
अयोध्येत राममंदिर भूमिपूजनाच्या आधी ऑल इंडिया मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डाने विवादित ट्विट ककीत म्हटलं होतं की बाबरी मशीद नेहमीच होती आणि राहिल. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर सवाल करीत बोर्डाने सांगितले की हा निर्णय अन्यायपूर्ण, चिंता वाढवणारा आहे.