मराठी बातम्या /बातम्या /देश /भयंकर! पिठाच्या गिरणीत केस अडकल्याचं निमित्त; महिलेचं शीर धडावेगळं होऊन झाला करुण मृत्यू

भयंकर! पिठाच्या गिरणीत केस अडकल्याचं निमित्त; महिलेचं शीर धडावेगळं होऊन झाला करुण मृत्यू

या घटनेनंतर नागार्जुनने स्वत:च पोलीस स्टेशनला जाऊन आपला गुन्हा कबूल केला. पोलिसांनी केलेल्या तपासामध्ये नागार्जुन हा महिलेचा नववा पती असल्याचे समोर आले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार महिला पुरुषांशी जवळीक साधत कालांतराने त्यांच्याशी लग्न करत होती.

या घटनेनंतर नागार्जुनने स्वत:च पोलीस स्टेशनला जाऊन आपला गुन्हा कबूल केला. पोलिसांनी केलेल्या तपासामध्ये नागार्जुन हा महिलेचा नववा पती असल्याचे समोर आले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार महिला पुरुषांशी जवळीक साधत कालांतराने त्यांच्याशी लग्न करत होती.

पीठ दळण्याच्या गिरणीमध्ये (Flour Mills) अडकून एका महिलेचा मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 30 वर्षाच्या या महिलेचे केस पीठाच्या गिरणीमध्ये अडकले होते. यानंतर महिलेचं डोकं गिरणीत अडकले आणि तिचं शीर धडावेगळं झालं.

    नवी दिल्ली 26 जानेवारी : अपघाताला कुठलं छोटंसं कारण पुरेल आणि कधी कुठलं मशीन किंवा आणखी काही काळ बनून समोर येईल सांगता येत नाही. नेहमीच्या पिठाच्या गिरणीत केस अडकायचं निमित्त एका महिलेच्या भयंकर अंताला कारणीभूत ठरलं. क्षणिक दुर्लक्ष थेट तिला जीवानिशी घेऊन गेलं.  पंजाबच्या (Punjab)  फिरोजपूरमधून एक अत्यंत वेदनादायी घटना समोर आली आहे.फिरोजपूरमधील एका गावात पीठ दळण्याच्या गिरणीमध्ये (Flour Mills) अडकून एका कामगार महिलेचा मृत्यू झाला आहे.

    बलजीत कौर नावाची 30 वर्षांची महिला पिठाच्या गिरणीत काम करते. पीठ दळून देत असताना तिचे लांबसडक केस पिठाच्या गिरणीमध्ये अडकले (head stuck in flour mill) होते. या घटनेत महिलेला आपला जीव गमवावा लागला आहे.

    महिलेचे केस गिरणीत अडकले आणि पुढे त्याच जोराने तिचं डोकंही चक्कीत गेलं. अखेर शीर धडावेगळं झालं. या घटनेतच महिलेचा मृत्यू झाला. ही महिला फिरोजपूरमधील एका पीठाच्या गिरणीवर काम करत होती. मिळालेल्या माहितीनुसार, मृत महिला बलजीत कौर सेखवान गावातील रहिवासी होती. पीठाच्या गिरणीमध्ये धान्य दळण्यासाठी एक ग्राहक आला होता. यादरम्यान ग्राहकाच्या समोरच हा संपूर्ण प्रकार घडला.

    नेमकी कशी घडली घटना -

    गिरणीमध्ये धान्य दळण्यासाठी टाकलेलं असतानाच सुरुवातीला महिलेचे केस अचानक या गिरणीमध्ये अडकले. यानंतर महिलेचं डोकंही गिरणीमध्ये ओढलं गेलं. या घटनेत संबंधित महिलेचं डोकं धडावेगळं झालं. ही घटना इतकी भयंकर होती, की यात महिलेचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर महिलेच्या कुटुंबातील सदस्यांनी हळहळ व्यक्त केली आहे. याबद्दल माहिती मिळताच काही वेळातच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घटनेची पाहणी केली. तसंच महिलेचं शरीर शवविच्छेदनासाठी (postmortem) पाठवलं. सोबतच या घटनेची नोंददेखील करुन घेण्यात आली. घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

    First published:
    top videos

      Tags: Person death