'ते डॉक्टरांच्या अंगावर थुंकतात, अवाजवी मागण्या करतात'; निजामुद्दीनमधील 167 क्वारंटाइनचा मुजोरपणा

'ते डॉक्टरांच्या अंगावर थुंकतात, अवाजवी मागण्या करतात'; निजामुद्दीनमधील 167 क्वारंटाइनचा मुजोरपणा

दिल्ली रुग्णालयात दाखल केलेल्या एका रुग्णांने सहाव्या मजल्यावरुन आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे

  • Share this:

नवी दिल्ली, 1 एप्रिल : दिल्लीतील (Delhi) निजामुद्दीन मर्कझ येथील मशिदीतील 167 जणांना क्वारंटाइन करण्यात आलं आहे. निजामुद्दीन मर्कझ तबलिगी यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात परदेशातील नागरिक असल्याने तेथे अनेकांना कोरोनाची (Covid - 19) लागण झाल्याची भीती व्यक्त केली जात असल्याने सध्या तेथील 167 जणांना क्वारंटाइन करण्यात आलं आहे.

तबलिगी जमात निजामुद्दीन येथील 167 जणांना काल साधारण 9.40 वाजता 5 बसेसमधून क्वारंटाइन सेंटरमध्ये आणण्यात आले होते. यापैकी 97 जणांना Diesel Shed Training School Hostel येथील क्वारंटाइनमध्ये ठेवले आहे. तर उरलेल्या 70 जणांना RPF Barrack या क्वारंटाइनमध्ये ठेवलं आहे, अशी माहिती सीपीआरओ दीपक कुमार यांनी दिली.

क्वारंटाइनकडून वैद्यकीय कर्मचाऱ्यासोबत गैरवर्तणूक

ते सकाळपासून वाईट पद्धतीने वागत असल्याची माहिती रेल्वेच्या सीपीआरओ यांनी दिली. ते म्हणाले, क्वारंटाइनमधील या व्यक्ती खाण्याच्या अवाजवी मागण्या करीत आहेत. ते वैद्यकीय कर्मचाऱ्यांसोबत गैरव्यवहार करीत आहेत. त्यांच्याशी वाईट पद्धतीने वागत आहेत. ते सर्वत्र थुंकत आहेत. इतकचं नाही तर त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या अंगावर थुंकतात. याशिवाय ते हॉस्टेल इमारतीच्या भागात फिरत आहेत. याबाबतची माहिती दिल्लीच्या दक्षिण पूर्व डीएमना सांगण्यात आले आहे. शिवाय येथे आवश्यक सुरक्षा व्यवस्था वाढविण्यास सांगण्यात आले आहे. अन्यथा त्यांना दुसऱ्या ठिकाणी हलविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. आज साधारण 5.30 वाजता सीआरपीएफचे 6 जवान आणि दिल्ली पोलीस कॉन्स्टेबल आणि पीसीआर वॅन तेथे तैनात करण्यात आल्याची माहिती सीपीआरओ दीपक कुमार यांनी दिली.

आत्महत्या करण्याचा प्रयत्न

तर दुसरीकडे निझामुद्दीन मर्कझ येथील एका व्यक्तीला दिल्लीतील राजीव गांधी सुपर स्पेशालिटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या रुग्णाने सहाव्या मजल्यावरुन उडी मारुन जीव देण्याचा प्रयत्न केला. यावेळी रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांनी त्याला वाचवले व पुन्हा अशी घटना घडू नये यासाठी सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आल्याचे रुग्णालय व्यवस्थापनाने सांगितले.

First published: April 1, 2020, 9:10 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading