जाहिरात
मराठी बातम्या / देश / नितीन गडकरींची मोठी घोषणा! देशात उभारणार इलेक्ट्रिक हायवे; रेल्वेप्रमाणे विजेवर धावणार ट्रक, बसेस

नितीन गडकरींची मोठी घोषणा! देशात उभारणार इलेक्ट्रिक हायवे; रेल्वेप्रमाणे विजेवर धावणार ट्रक, बसेस

देशात उभारणार इलेकट्रीक हायवे

देशात उभारणार इलेकट्रीक हायवे

ही मोठी इलेक्ट्रिक वाहनं महामार्गावर ओव्हरहेड बसवलेल्या इलेक्ट्रिक केबल्सच्या साह्याने (Electric Cable) चार्ज करता येतील. याबाबतच्या प्रस्तावावर विचारविनिमय सुरू झाला आहे.

  • -MIN READ Trending Desk Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 12 सप्टेंबर: इंधनाचे (Fuel) दर सातत्याने वाढत आहेत. वायू प्रदूषणाची पातळीदेखील वाढत चालली आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांचा इलेक्ट्रिक वाहनांच्या (Electric Vehicle) खरेदीकडे कल वाढत आहे. सध्या बाजारात इलेक्ट्रिक स्कूटर आणि कार्स ग्राहकांसाठी उपलब्ध आहेत. परंतु, आगामी काळात इलेक्ट्रिक वाहनांची बाजारपेठ अधिक विस्तारणार आहे. अर्थात त्यामागे कारणही तितकंच महत्त्वाचं आहे. भारतात इलेक्ट्रिक हायवे अर्थात विद्युत महामार्ग (Electric Highway) उभारला जाणार आहे. बस, ट्रकसारखी अवजड वाहनंदेखील विजेवर चालवण्याची तयारी सरकारने सुरू केली आहे. हे ट्रक आणि बसेस इलेक्ट्रिक वाहनांसारखे असतील; मात्र ही मोठी इलेक्ट्रिक वाहनं महामार्गावर ओव्हरहेड बसवलेल्या इलेक्ट्रिक केबल्सच्या साह्याने (Electric Cable) चार्ज करता येतील. याबाबतच्या प्रस्तावावर विचारविनिमय सुरू झाला आहे. `टीव्ही नाइन हिंदी`ने याबाबतचं वृत्त दिलं आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी ( Union Minister Nitin Gadkari) यांनी सोमवारी (12 सप्टेंबर) इंडो-अमेरिकन चेंबर ऑफ कॉमर्स या उद्योग संस्थेच्या कार्यक्रमात बोलताना एक महत्त्वाची माहिती दिली. ते म्हणाले, `सरकार सौर ऊर्जेच्या (Solar Energy) माध्यमातून इलेक्ट्रिक हायवे अर्थात विद्युत महामार्गांच्या विकासावर काम करत आहे. यामुळे उच्च मालवाहतूक क्षमता असलेले ट्रक आणि बसेसचं चार्जिंग सुलभ होईल.` मृत्यूला जवळून पाहिलं! दैव बलवत्तर म्हणून ‘तो’ असा वाचला, पाहा थरारक VIDEO

‘सरकारला देशातली सार्वजनिक वाहतूक व्यवस्था (Public Transport System) विद्युतचलित बनवायची आहे. सरकार इलेक्ट्रिक वाहनांसाठी सौर आणि पवन ऊर्जेवर आधारित चार्जिंग प्रणाली विकसित करण्यास प्रोत्साहन देत आहे,` असा पुनरुच्चार गडकरी यांनी या वेळी केला.

केंद्रीय मंत्री गडकरी म्हणाले, `भारत आणि अमेरिका हे दोन्ही देश नैसर्गिक भागीदार आहेत. राष्ट्रीय महामार्गांलगत सुमारे तीन कोटी झाडं लावण्यात येणार असून, महामार्गाचं बांधकाम आणि विस्तारीकरणादरम्यान झाडं लावण्याच्या धोरणाचं पालन सरकार करत आहे. आतापर्यंत सरकारने राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांतर्गत 27 हजार वृक्षांची एका ठिकाणाहून दुसरीकडे यशस्वीपणे लागवड केली आहे. वृक्षतोड आणि वृक्ष लागवडीसाठी सरकार ट्री बॅंक (Tree Bank) नावानं नवीन धोरण तयार करत आहे,` असं गडकरी यांनी सांगितलं. या वेळी गडकरी यांनी अमेरिकेतल्या खासगी गुंतवणूकदारांना भारतात लॉजिस्टिक, रोपवे आणि केबल कार क्षेत्रात गुंतवणुकीसाठी आमंत्रित केलं. ‘आम्ही इलेक्ट्रिक हायवे विकसित करण्याच्या दृष्टीनं काम करत आहोत. ते सौर ऊर्जेवर आधारित असतील. त्यामुळे अवजड मालवाहतूक क्षमता असलेले ट्रक आणि बस प्रवासादरम्यान चार्जिंग करण्याची सुविधा मिळेल. इलेक्ट्रिक हायवे म्हणजे असा मार्ग जो त्यावरून प्रवास करणाऱ्या वाहनांना वीज पुरवतो. यामध्ये ओव्हरहेड पॉवर लाइनद्वारे (Overhead Power Line) ऊर्जा पुरवठ्याचा समावेश आहे,` असं गडकरी यांनी सांगितलं. सरकारकडून हुंडा प्रथेचं समर्थन? गडकरींनी शेअर केलेल्या अक्षय कुमारच्या त्या VIDEO वरुन राजकारण ‘टोल प्लाझा सौरऊर्जेवर चालवण्यासाठी रस्ते मंत्रालय प्रोत्साहन देत आहे. चांगल्या विकसित पायाभूत सुविधांमुळे आर्थिक उलाढाल वाढते, नवीन कंपन्या निर्माण होतात आणि रोजगाराच्या संधीदेखील वाढतात. आम्ही 26 नवीन एक्सप्रेस वे बांधत आहोत. पीएम गतिशक्ती योजना लॉंच केल्याने प्रकल्पांना जलद मंजुरी मिळेल आणि यामुळे लॉजिस्टिक खर्च कमी होईल,` असं केंद्रीय मंत्री गडकरी यांनी नमूद केलं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात