दिल्ली, 19 मार्च : तीन वर्षांपूर्वी जगभरात कोरोनाने हाहाकार माजवला होता. तेव्हा भारतात कोविड १९ लसीकरण विक्रमी पातळीवर करण्यात आले. ही लसीकरण मोहिम जगात सर्वाधिक मोठी ठरली होती. पण पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भारताने हा प्रवास कसा सुरू केला? या ऐतिहासिक आणि अभूतपूर्व अशा लढ्यावर हिस्ट्री टीव्ही१८ने द वायल - इंडियाज व्हॅक्सिन स्टोरी हा माहितीपट तयार केला आहे. २४ मार्च २०२३ रोजी रात्री ८ वाजता हा माहितीपट पाहता येणार आहे.
‘द व्हायल’च्या माध्यमातून कोविड-19 लसीच्या निर्मितीवेळी काय घडलं याच्या आठवणी पुन्हा जाग्या होतात . कोविड १९ लस कमी वेळेत विकसीत करून त्याचे उत्पादन आणि वितरण सुनियोजित पद्धतीने करण्याच्या भारताच्या यशाचं रहस्य यातून उलगडण्यात आलंय.
जवळपास ६० मिनिटांच्या या माहितीपटाचं वर्णन प्रसिद्ध अभिनेते मनोज वाजपेयी यांनी केलंय. पंतप्रधान मोदी स्वत: ज्यात आहेत अशी ही पहिली डॉक्युमेंटरी आहे. कोरोना साथीवर भारताने कसा विजय मिळवला याबद्दल ते सविस्तर यामध्ये सांगतात. हिस्ट्री टीव्ही १८ ने या डॉक्युमेंट्रीचा ट्रेलर रिलीज केलाय. यामध्ये सीरम इन्स्टिट्यूटचे सीईओ आदर पूनावाला, मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्ससुद्धा दिसतात.
'द व्हायल' मध्ये कोविशिल्ड लस कशी तयार झाली त्याचाही इतिहास आहे. पुण्याच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीमध्ये देशाच्या मोठ्या लोकसंख्येला पुरेल इतक्या लसीच्या अब्जावधी पाटल्या तयार करण्याचं काम विक्रमी वेळेत झालं. नेटवर्क 18 शी बोलताना मनोज वाजपेयी म्हणाले: “भारताची कोविड-19 लसीची ही कहाणी देशासाठी एक उल्लेखनीय कामगिरी आहे आणि भारतीय म्हणून आपण सर्वांनी त्याबद्दल अभिमान बाळगला पाहिजे. हा चित्रपट आमच्या आरोग्यसेवा व्यावसायिकांना आणि अग्रभागी कामगारांना अर्पण करण्यात येतोय ज्यांनी अभूतपूर्व वेळेत लसींची निर्मिती केली. अनेक आव्हाने असतानाही लसीकरण मोहीम राबवली. त्यांच्यामुळेच आज आपण आत्मविश्वासाने घराबाहेर पडतोय.”
‘द व्हायल’ काही केस स्टडीजकडे बारकाईने लक्ष वेधून घेते. भारत सरकार आणि आरोग्य कर्मचार्यांनी कोरोनासारख्या कठीण काळात दाखवलेल्या निर्धारावर प्रकाशझोत टाकण्यात आलाय. अगदी दुर्गम भागातही लोकांपर्यंत लस उपलब्ध करून देण्यासाठी त्यांनी नैसर्गिक आव्हानांशी सामना केला.
भारताlrn बहुसंख्य लोकांना लसीचा किमान एक डोस मिळाला आहे. भारतात असलेली विविधता लक्षात घेता हे एक अत्यंत कठीण काम आहे. भारताने लस मैत्री उपक्रमाद्वारे जगासमोर एक आदर्श असं उदाहरणही ठेवलंय. लस मैत्रींतर्गत भारताने 100 देशांमध्ये कोविड-19 लसीचे 232.43 दशलक्ष डोस पोहोचवले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.