Home /News /national /

जिद्दीला सलाम! चहा विकणाऱ्याच्या मुलीने स्वप्न केलं पूर्ण; फ्लाईंग ऑफिसर बनून आकाशात घेतली भरारी

जिद्दीला सलाम! चहा विकणाऱ्याच्या मुलीने स्वप्न केलं पूर्ण; फ्लाईंग ऑफिसर बनून आकाशात घेतली भरारी

घरची परिस्थितीत हलाखीची होती. मात्र तिला आकाशात भरारी घ्यायची होती. यासाठी तिने दोन सरकारी नोकऱ्या सोडल्या.

    नवी दिल्ली, 21 जून : हैद्राबादमधील एअरफोर्स ट्रेनिंद अकॅडमीमझील एअर चीफ मार्शल आरकेएस भदौरियामध्ये जेव्हा आंचल गंगवाल कूच करत होती तेव्हा  जवळपास 1500 किमी अंतरावर असलेल्या मध्य प्रदेशातील नीमच जिल्ह्यातील एक चहा विक्रेताच्या चेहऱ्यावर आनंदाश्रू होते. तसं पाहता सुरेश यांच्या आयुष्यात आनंदाच्या संधी कमी आल्या आहेत. नीमचच्या सुरेश चैवळे यांची मुलगी फ्लाइंग ऑफिसर बनली आहे. शनिवारी आंचल गंगवाल यांना 123 कॅडेटसह हवाई दलात नियुक्त केले गेले. कोरोना साथीच्या आजारामुळे कॅडेट्सच्या पालकांना प्रथमच पासिंग आउट परेडमध्ये भाग घेण्यासाठी आमंत्रित करण्यात आले नव्हते. आंचल म्हणते की, ‘प्रत्येकाची इच्छा होती की जेव्हा त्यांचं स्वप्न साकार होईल, तेव्हा त्यांचे आई-वडील ते पूर्ण होताना पाहतील. माझे आई-बाबा हैदराबादला येऊ शकले नाही, पण  त्यांनी संपूर्ण  मार्च ऑनलाईन पाहिली आहे. मी जे काही करण्यास सक्षम आहे, ते माझ्या पालकांच्या मेहनतीमुळे शक्य झाले आहे. आंचलने पोलीस उपनिरीक्षक आणि कामगार निरीक्षकाची नोकरी सोडली. तिची एअरफोर्स अधिकारी होण्याची इच्छा होती. आंचनले वडील सुरेश गंगवाल म्हणतात की, उत्तराखंडच्या केदारनाथमधील दुर्घटनेने आंचलच्या जीवनाचे ध्येय बदलले. केदारनाथ दुर्घटनेत हवाई दलाने ज्या प्रकारे लोकांना मदत केली, ते पाहून आंचल यांनी हवाई दलात भाग घेऊन देशाची सेवा करण्याची इच्छा निर्माण केली. दरम्यान आंचलची पहिल्यांदा मध्य प्रदेश पोलिसात सब इन्स्पेक्टर म्हणून निवड झाली. पण साडेतीन महिन्यांच्या प्रशिक्षणानंतर आंचलने आपल्या पोलीस नोकरीतून राजीनामा दिला. चहा विकून तीन मुलांना शिकवणारे सुरेश म्हणतात, 'मी मुलीला पोलिसांची नोकरी सोडू नये म्हणून खूप समजावून सांगितले. पण ती ऐकत नव्हती. त्यानंतर लवकरच तिला कामगार निरीक्षक म्हणून निवडण्यात आले. पण ज्या व्यक्तीला आकाशात उडण्याची हौस आहे, ती या नोकरीत रुळू शकली नाही. काही  महिन्यांनंतर तिने कामगार निरीक्षकाच्या पदाचा राजीनामा दिला. सुरेश यांनी आपल्या मुलीला दोन्ही वेळा नोकरी सोडू नको असा सल्ला दिला होता. मात्र मुलीची स्वप्न खूप मोठी होती. संपादन - मीनल गांगुर्डे हे वाचा-धक्कादायक! राजधानी दिल्ली हाय अलर्टवर; दहशतवाद्यांकडून रचला जातोय हल्ल्याचा कट
    First published:

    Tags: Officer

    पुढील बातम्या