मुंबई, 30 जानेवारी : राम मंदिर निर्माणासाठी सुरू असलेल्या जनसंपर्क अभियानाअंतर्गत मुंबईतील मुस्लीम समाजाकडून आर्थिक मदत करण्यात आली. मुंबई भाजप (Mumbai BJP) अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष वशिम खान यांना दावा केला आहे की, मुस्लीम समाजाशी संबंधित तब्बल 36 वेगवेगळ्या छोट्या-मोठ्या सामाजिक संस्थांनी कार्यक्रमात सहभागी होत मंदिर निर्माणासाठी 20 लाखांची आर्थिक मदत केली आहे. या कार्यक्रमात जैन समाजातील लोकही उपस्थित होते. राम मंदिर तीर्थक्षेत्र विकासचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांच्या उपस्थितीत आयोजित कार्यक्रमात अभिनेता रजा मुराद (Raza Murad) देखील उपस्थित होते.
यावेळी रजा मुराद म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर अयोध्या मंदिराचा सर्व वाद संपला आहे. आपण सर्व या भूमीची लेकरं आहोत. आज राम मंदिर निर्माणासाठी आपण सर्व भारतीय मनाने मदत करीत एक पाऊल पुढे जात आहोत.
हे ही वाचा-No Means No! महिलेने दिलेला नकार म्हणजे? नसेल कळालं तर VIDEO पाहा
सध्या देशभरात राम मंदिर निर्माणासाठी निधी जमा केला जात आहे. तेलंगणा भाजपचे अध्यक्ष आणि खासदार बंदी संजय कुमार यांनी नुकताच राम जन्मभूमी निधी समर्पण अभियानाअंतर्गत जनजागरण कार्यक्रमाची सुरुवात केली. ते म्हणाले की, या कार्यक्रमाचं आयोजन अयोध्येमधील राम मंदिर निर्माणासाठी निधी जमा करण्यासाठी करण्यात आला आहे. सर्वांना पुढे यायला हवं आणि राम मंदिर निर्माण आणि विकासासाठी दान करायला हवं.
भाजप प्रदेश अध्यक्षांनी सांगितलं की, राम मंदिर निर्माणात दान देण्यासाठी अनेक पक्षाचे नेते पुढे आले आहेत. ते म्हणाले की, जनतेकडून चांगली प्रतिक्रिया मिळत आहे. मी तेलंगनाचे मुख्यमंत्री कें. चंद्रशेखर राव यांच्याकडूनही आशा करतो की त्यांची चांगल्या कामासाठी पुढे यावे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Ayodhya ram mandir