Home /News /national /

आदिवासी भागातील प्रसिद्ध मोहाच्या दारुचा ब्रँड; या राज्याने तयार केली 'हेरिटेज मदिरा पॉलिसी'

आदिवासी भागातील प्रसिद्ध मोहाच्या दारुचा ब्रँड; या राज्याने तयार केली 'हेरिटेज मदिरा पॉलिसी'

आदिवासी भागात प्रसिद्ध मोहाची दारू आता बाटलीबंद स्वरुपात पाहता येणार आहे

    भोपाळ, 31 डिसेंबर : मध्य प्रदेशात (Madhya Pradesh) आता सरकार हेरिटेज वाइन पॉलिसी (Heritage Wine Policy) आणत आहे. याअंतर्गत सरकार आता मोहाच्या फुलांची दारू तयार करुन त्याची विक्री करण्याची तयारी करीत आहे. यासंदर्भात हेरिटेज मदिरा पॉलिसी (Heritage Wine Policy) तयार करण्यात आली आहे. ही योजना लवकरच कॅबिनेटच्या बैठकीत आणण्यात येईल. या पॉलिसीमागे महसूल वाढविणे आणि आदिवासींना रोजगार उपलब्ध करणे हे ध्येय आहे. राजस्थानमधील जोधपुरमध्ये ‘चंद्रहास’ आणि उदयपुरमध्ये ‘आशा’ ब्रँडची दारु तयार केली जाते. आता या धर्तीवर मध्य प्रदेश सरकारनेही दारू तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. ही दारू मोहाच्या फुलांपासून तयार केली जाईल आणि याची दारुच्या दुकांनांबाहेर विक्री केली जाईल. अद्याप दारुच्या ब्रँडचं नाव ठरविण्यात आलेलं नाही. सरकार मोहापासून तयार केलेली दारू मप्र या नावाने राज्याच्या बाहेर पाठविणार आहे. त्याशिवाय याच्या दर्जाबाबत अधिक काळजी घेतली जाणार आहे. हे ही वाचा-नोकरदार वर्गासाठी आनंदाची बातमी! कामाचे तास आठच राहण्याची शक्यता- अहवाल कॅबिनेटमध्ये आणणार पॉलिसी.. उत्पादन शुल्क विभागाचे हे हेरिटेज मदिरा पॉलिसी मंत्रिमंडळात आणले जाईल. या धोरणांतर्गत मध्य प्रदेशच्या आदिवासी भागातील बचतगटांच्या मदतीने दारू तयार करतील. आदिवासी भागातील लोकांना मोहाच्या दारुतून रोजगार मिळावा यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. महसूल वाढविण्याचा प्रयत्न... या पॉलिसीमागे महसूल वाढविण्यासाठी प्रयत्न केला जात असल्याचे सांगितले जात आहे. जर सरकार मोहापासून तयार केलेली दारू तयार करुन त्याची विक्री करते तर त्यातून 300 कोटींहून अधिक महसूल मिळू शकतो. हेरिटेज मदिरा पॉलिसीसोबत दारूचं उत्पादन, बॉटलिंग आणि विक्रीच्या प्रक्रियेत सुधारणा करण्याचा प्रस्ताव आहे. सरकारने यापूर्वी विलेज टूरिजम पॉलिसी आणली आहे. याअंतर्गत ग्रामीण भागात स्थित दर्शनीय, ऐतिहासिक आणि धार्मिक ठिकाणांना पर्यटन स्थळांप्रमाणे विकसित करीत पर्यटन वाढवले जाऊ शकते. त्या साखळीत आता हेरिटेज वाइन पॉलिसीची अंतर्भाव आहे.

    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Madhya pradesh

    पुढील बातम्या