अरेच्या.. डॉक्टरांनी सामोशाचं केलं पोस्टमार्टम; तर निघाली साबणाची वडी

अरेच्या.. डॉक्टरांनी सामोशाचं केलं पोस्टमार्टम; तर निघाली साबणाची वडी

स्वत:चा जीव धोक्यात घालून रुग्णांचा जीव वाचविणाऱ्या योद्ध्यांसोबत अशी वागणूक केली जात आहे

  • Share this:

शिमला, 22 ऑगस्ट : सध्या देशभरात कोरोनाचा कहर सुरू आहे. यामध्ये आतापर्यंत अनेक डॉक्टरांनी आपल्या जीवाची पर्वा न करता रुग्णसेवेसाठी पुढाकार घेतला आहे. अनेकांचा यामध्ये मृत्यू झाला आहे. तर दुसरीकडे याच डॉक्टरांसोबत वाईट वागणूक केली जात असल्याचे वृत्त समोर येत आहे.

अनेक ठिकाणी आजही डॉक्टरांना मारहाण केल्याचे ऐकण्यात येते. शिमला येथे तर अत्यंत भयानक प्रकार समोर येत आहे. येथील प्रशिक्षण घेणाऱ्या डॉक्टरांच्या आरोग्याशी खेळ केला जात आहे.  शिमला (Shimla) च्या इंदिरा गांधी मेडिकल कॉलेज (IGMC) च्या कँटीनमध्ये (canteen) सर्वसामान्य लोकांसह  डॉक्टरांच्या (Doctors) आरोग्याशी खेळ केला जात आहे. येथील कँटीनमध्ये खाण्याची गुणवत्ता दिवसेंदिवस खराब होत आहे. शनिवारी कँटीनमध्ये सामोश्यात साबणाची वडी (Soap cake) मिळाली. काही दिवसांपूर्वी येथील कँटीनमध्ये खाण्यात झुरळ (Cockroach) दिसले होते.

यापूर्वी मिळालं होतं झुरळ

हे प्रकरण शनिवारचे आहे. आइजीएमसीच्या कँटीनमध्ये डॉक्टरांचा एक ग्रुप सामोसे खात बसला होता. तेथे त्यांना सामोशात साबणाची चव लागली, त्यांनी सामोसा उघडूम पाहिला तर त्यात साबणाची अर्धी वडी निघाली. डॉक्टरांनी याची तक्रार आईजीएमसीच्या मेडिकल सुपरिंटेंडेंट (MS) यांच्याकडे केली आहे. डॉक्टरांचं म्हणणं आहे की ही पहिली वेळ नाही, तर यापूर्वीही अनेकदा जेवणात काहीतरी गोंधळ झाल्याचे समोर आले आहे. अनेकदा तक्रार करुनही काहीच परिणाम झाला नसल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. यापूर्वी खाण्यातून झुरळ निघाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

Published by: Meenal Gangurde
First published: August 22, 2020, 10:45 PM IST
Tags: doctor

ताज्या बातम्या