जाहिरात
मराठी बातम्या / देश / देशातल्या प्रत्येक मुलीला केंद्र सरकार देतंय दीड लाख रुपये; काय आहे सत्य?

देशातल्या प्रत्येक मुलीला केंद्र सरकार देतंय दीड लाख रुपये; काय आहे सत्य?

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

केंद्र सरकार देशातल्या मुलींसाठी अनेक योजना राबवत आहे. त्याअंतर्गत गरीब आणि गरजूंना आर्थिक मदत केली जाते. सध्या एक व्हिडिओ व्हायरल होत असून, त्यामध्ये सरकारतर्फे ‘पंतप्रधान कन्या आशीर्वाद योजना’ राबवली जात असल्याची माहिती देण्यात आली आहे.

  • -MIN READ Trending Desk Maharashtra
  • Last Updated :

    मुंबई,8 ऑक्टोबर-  केंद्र सरकार देशातल्या मुलींसाठी अनेक योजना राबवत आहे. त्याअंतर्गत गरीब आणि गरजूंना आर्थिक मदत केली जाते. सध्या एक व्हिडिओ व्हायरल होत असून, त्यामध्ये सरकारतर्फे ‘पंतप्रधान कन्या आशीर्वाद योजना’ राबवली जात असल्याची माहिती देण्यात आली असून, त्याअंतर्गत सर्व मुलींना सरकार 1.50 लाख रुपये देत असल्याचा दावा केला जात आहे; पण सरकारने मात्र आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून या व्हायरल व्हिडिओशी संबंधित अतिशय महत्त्वाची माहिती दिली आहे. त्या व्हिडिओतली माहिती खरी नसल्याचं सरकारने स्पष्ट केलं आहे. व्हिडिओमध्ये नेमकं काय? व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये असं म्हटलं आहे, की केंद्रातल्या मोदी सरकारने पंतप्रधान कन्या आशीर्वाद योजना सुरू केली असून सरकार या योजनेंतर्गत प्रत्येक मुलीला 1,50,000 रुपयांची आर्थिक मदत देत आहे. हा व्हिडिओ सरकारी गुरू नावाच्या यू-ट्यूब चॅनेलवर प्रसिद्ध करण्यात आला आहे. व्हिडिओच्या सत्यतेबाबत सरकार म्हणतं… ‘पीआयबी फॅक्ट चेक’ने ट्विट करून या व्हिडिओची सत्यता सांगितली आहे. पीआयबीने ट्विटरमधून स्पष्ट केलं आहे, की सरकार अशी कोणतीही योजना चालवत नाही आणि या व्हिडिओतला संदेश पूर्णपणे खोटा आहे.

    जाहिरात

    तुम्हालाही करता येईल संशयास्पद बातम्यासंबंधी खात्री सोशल मीडियाच्या जमान्यात अनेकदा चुकीच्या बातम्या व्हायरल होऊ लागतात. अशा बातम्यांच्या सत्यतेची खात्री आपल्यालाही पटवता येते. सोशल मीडिया अकाउंट किंवा व्हॉट्सअ‍ॅपवरच्या कोणत्याही बातमीबाबत संशय असल्यास, तुम्ही पीआयबीद्वारे फॅक्ट चेक करून घेऊ शकता. यासाठी तुम्हाला https://factcheck.pib.gov.in/ या अधिकृत लिंकला भेट द्यावी लागेल. याशिवाय, तुम्ही 8799711259 हा व्हॉट्सअ‍ॅप क्रमांक किंवा pibfactcheck@gmail.com या ई-मेलवरसुद्धा माहिती पाठवू शकता. ती बातमी खरी आहे की खोटी, याची माहिती अर्जदाराला कळवण्यात येते. **(हे वाचा:** महामारीच्या काळात ‘ही’ योजना भारतासाठी बूस्टर, वर्ल्ड बँकेनंही केलं कौतुक ) अनेकदा सोशल मीडियावर बरेच व्हिडिओ व्हायरल होत असतात. यामध्ये काही व्हिडिओ रंजक असतात, तर काही व्हिडिओ थरारक असतात. बऱ्याचवेळा विविध योजनांची माहितीही या व्हिडिओमधून देण्यात येत असते. सोशल मीडियावरचे व्हिडिओ पाहून बऱ्याचदा त्या व्हिडिओमध्ये देण्यात आलेली माहिती खरी आहे का खोटी, याबाबत आपल्या मनात शंका निर्माण होते. अशा वेळी संबंधित व्हिडिओची सत्यता तपासणं गरजेचं आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमधली माहिती खरी आहे का खोटी, याची खात्री झाल्याशिवाय असे व्हिडिओ फॉरवर्ड न करणं केव्हाही फायद्याचं ठरतं. त्या दृष्टीने काळजी घेणं महत्त्वाचं आहे.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात