चंदीगड, 6 मार्च : पंजाबच्या (Punjab News) सीमावर्ती शहर अमृतसरमध्ये सीमा सुरक्षा दलाच्या (BSF) शिबिरात एका कर्मचाऱ्याने रविवारी कथित स्वरुपात गोळीबार केला. ज्यात बीएसएफचे कमीत कमी चार कर्मचाऱ्यांना मृत्यू झाला आणि अन्य जखमी झाले आहेत. यादरम्यान गोळीबार करणाऱ्या कर्मचाऱ्यांचाही मृत्यू झाला. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना साडे 9 ते 10 यादरम्यान झाली आहे. या शिबिरात एका कर्मचाऱ्याने रविवारी कथित रुपात गोळीबार केला. ज्यात बीएसएफच्या कमीत कमी चार कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आणि अन्य एक जखमी झाला. यादरम्यान गोळीबार करणाऱ्या कर्मचाऱ्याचाही मृत्यू झाला. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना साडे नऊ ते पावणे 10 दरम्यान झाली. जेव्हा कॉन्स्टेबल सातेप्पा एस.के यांनी आपल्या सर्विस रायफलने आपल्या पाच कर्मचाऱ्यांवर कथित रुपात गोळीबार केला आणि यादरम्यान आरोपी सातेप्पाचाही मृत्यू झाला. त्यांनी सांगितलं की, ही घटना भारत-पाकिस्तान आंतरराष्ट्रीय सीमेजवळ अटारी-वाघा सीमा चौकीपासून तब्बल 12-13 किलोमीटर दूर खासा भागात 144 व्या बटालियन परिसरात झाली. अधिकाऱ्यांनी सांगितलं की, आरोपी आपल्या कामाच्या तासांवरुन संतापला होता आणि त्याने परिसरात उभ्या असलेल्या कमांडिर ऑफिसरच्या वाहनावर गोळीबार केला. हे ही वाचा- अरे नको नको..चुना लावा; मोदींनी घेतला लंकेच्या प्रसिद्ध पानाचा आस्वाद, पहा VIDEO बीएसएफच्या एक प्रवक्त्यांनी सांगितलं की, अमृतसरमध्ये दलाच्या एका शिबिरात जवानाने गोळीबारात पाच बीएसएफ कर्मचाऱ्यांची हत्या केली. गोळीबारात जखमी 6 जवांनाची स्थिती गंभीर आहे आणि त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. गोळीबारात मृत्यू वा जखमी झालेल्यांमध्ये कॉन्स्टेबल आणि हेड कॉन्स्टेबल रँकच्या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. प्रवक्त्यांनी सांगितलं की, या प्रकरणात कोर्ट ऑफ इन्क्वायरीचा आदेश देण्यात आला आहे. सीमा सुरक्षा दल आणि पंजाब पोलिसातील वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.