सीमेवरून सर्वात मोठी बातमी, लडाखमध्ये भारताच्या ताब्यात होता चीनचा कर्नल

सीमेवरून सर्वात मोठी बातमी, लडाखमध्ये भारताच्या ताब्यात होता चीनचा कर्नल

संघर्षानंतर दोन्ही देशांमध्ये तणाव निर्माण झाला आहे. अशातच एक महत्त्वपूर्ण माहिती समोर आली आहे.

  • Share this:

संदीप बोल, नवी दिल्ली, 21 जून : पूर्व लडाखमधील गलवान खोऱ्यामध्ये भारत आणि चीन सैनिकांमध्ये हिंसक संघर्ष झाला. या संघर्षानंतर दोन्ही देशांमध्ये तणाव निर्माण झाला आहे. अशातच एक महत्त्वपूर्ण माहिती समोर आली आहे. भारतीय सैन्याने चीनच्या कर्नल दर्जाच्या अधिकाऱ्याला ताब्यात घेतलं होतं. 10 भारतीय सैनिकांची चीनने सुटका केल्यानंतरच चीनच्या कर्नलला सोडण्यात आलं, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

'फक्त चीननेच भारतीय सैनिकांना सोडलं नाही, तर आपणही त्यांच्या अनेक सैनिकांना सोडून दिलं आहे,' अशी माहिती याआधीच केंद्रीय मंत्री आणि माजी लष्करप्रमुख जनरल वीके सिंह यांनी दिली होती. गलवान खोऱ्यात झालेल्या संघर्षानंतर चीन सैन्यानेही 10 भारतीय जवानांना ताब्यात घेतलं होतं. ताज्या माहितीनुसार चीनकडून भारतीय सैन्याला सोडण्यात आलं आहे. मात्र याबाबत लष्कराकडून कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

चीनसोबतच्या संघर्षानंतर काही भारतीय सैनिक बेपत्ता आहेत, असे वृत्त प्रसारमाध्यमाकडून देण्यात आले होते. मात्र हे वृत्त भारतीय लष्कराने फेटाळून लावलं होतं. 'कारवाई दरम्यान कोणताही भारतीय जवान बेपत्ता नाही,' असं लष्कराकडून सांगण्यात आलं होतं.

गलवान खोऱ्यावर चीनचा दावा

गलवान खोरं हा आमचाच भाग असून भारतीय सैन्यानं सीमारेषा पार केल्याचा दावा चीननं केला आहे. अनेक वर्षांपासून चीनचे सैनिक या भागात गस्त घातल असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. तर भारताची कुठलीही पोस्ट चीननं बळकावली नाही असा खुलासा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी संध्याकाळी पार पडलेल्या सर्वपक्षीय बैठकीत केला होता.

दरम्यान, चीनच्या फसवणुकीनंतर भारताने बर्‍याच पातळ्यांवर आक्रमक मुत्सद्दी योजना आखत आहे. भारताने प्लॅन बी देखील तयार केला आहे. तैवानशी सांस्कृतिक संबंध आणि संपर्क पातळीवर सहकार्य वाढवले जाईल. अशासकीय मोहिमेस सरकारही पाठिंबा देऊ शकते. त्याचबरोबर भारत तैवानला आंतरराष्ट्रीय स्तरावर पाठिंबा देणार्‍या देशांच्या पाठीशी उभे आहे. जागतिक मंचांवर चीनची पर्दाफाश करण्याची मोहीम ही भारत सुरू करणार आहे.

संपादन - अक्षय शितोळे

First published: June 21, 2020, 2:20 PM IST

ताज्या बातम्या