जम्मू-काश्मीर : एन्काऊंटरमध्ये 3 दहशतवाद्यांचा खात्मा, सुरक्षा दलाने उधळला हल्ल्याचा मोठा कट

जम्मू-काश्मीर : एन्काऊंटरमध्ये 3 दहशतवाद्यांचा खात्मा, सुरक्षा दलाने उधळला हल्ल्याचा मोठा कट

जम्मूच्या बाहेरील टोल प्लाझावर दहशतवाद्यांनी शुक्रवारी पहाटे जवानांवर हल्ला केला. यानंतर सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत 3 दहशतवाद्यांना ठार करण्यात आले आहे.

  • Share this:

जम्मू, 31 जानेवारी : जम्मूच्या बाहेरील टोल प्लाझावर दहशतवाद्यांनी शुक्रवारी पहाटे जवानांवर हल्ला केला. यानंतर सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत 3 दहशतवाद्यांना ठार करण्यात आले आहे. तर, 2 दहशतवाद्यांचा शोध सुरू आहे. या चकमकीत एक जवानही जखमी झाल्याची माहिती आहे.

वृत्तसंस्था पीटीआयच्या वृत्तानुसार, शुक्रवारी पहाटे जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावरील बन्न टोल प्लाझावर ट्रकमधून प्रवास करणाऱ्या जवानांवर 3-4 दहशतवाद्यांच्या पथकाने गोळीबार केला. त्यानंतर लवकरच सुरक्षा दलाने शोधमोहीम राबविली आणि त्या दहशतवाद्यांचा शोध लागला.

आज सर्व शाळा बंद ठेवल्या जातील

चकमकीनंतर राष्ट्रीय महामार्गही बंद करण्यात आला आहे. श्रीनगरमधील पोलिस पथकाने नागरोटाच्या बान परिसरातील टोल प्लाझाजवळ तपासणीसाठी ट्रक रोखला तेव्हा पहाटे पाच वाजता गोळीबार झाला, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. उधमपूर जिल्हाधिकारी यांनी आदेश दिले आहेत की खबरदारी म्हणून उधमपूर जिल्हा, टिकरी, मांड, राष्ट्रीय महामार्ग-क्षेत्र, चेन्नानी विभागातील सर्व शाळा आजसाठी बंद राहतील.

जवान-दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू

जम्मू-काश्मीरचे पोलिस महासंचालक दिलबाग सिंह यांनी, 3 दहशतवादी मारले गेले आहेत. तर इतर पळून जाण्यात यशस्वी झाले. दहशतवाद्यांना पकडण्यासाठी मोठ्या प्रमाणात शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे. हे दहशतवादी नवीन घुसखोरी गटाचे असून ते श्रीनगरला जात होते. त्यांनी कठुआ, हीरानगर हद्दीत घुसखोरी केली असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. या प्रकरणाचा तपास सुरू आहे.जम्मू-श्रीनगर महामार्गावरील टोल प्लाझाजवळ स्फोट झाल्याचा आवाज ऐकू आला, तेथे अतिरेकी आणि सुरक्षा दलातील चकमकी सुरू आहेत.

First published: January 31, 2020, 9:54 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading