देवप्रयाग (उत्तराखंड), 11 मे : देवप्रयागमध्ये (Devprayag Cloudburst) मंगळवारी ढगफुटीसदृश पाऊस झाल्यामुळे मोठं नुकसान झालं आहे. काही इमारतीच्या इमारती पाण्याच्या प्रवाहामुळे जमीनदोस्त झाल्या. नगरपालिकेचे बहुउद्देशीय भवन आणि आयटीआय ची इमारत या जलप्रलयामुळे जमीनदोस्त झाली. पाण्यासोबत वाहून आलेल्या कचऱ्यामुळे आणखीन आठ दुकाने पाण्याखाली आली. संचारबंदी असल्याने नागरिक बाहेर नव्हते त्यामुळे सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. पाण्यासोबत कचरा आणि रेती वाहून आल्याने जास्त नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे. जवळपास 12 ते 13 दुकानांचे मोठे नुकसान झाल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. उशिरापर्यंत मदतकार्य सुरू होते. टिहरी भागामधील देवप्रयाग (Devprayag Cloudburst) ठाणे क्षेत्रामध्ये ढग फुटी पावसाची घटना घडली आहे. यामध्ये सात ते आठ दुकाने आणि आयटीआय भवनचे जास्त नुकसान झाले आहे. या दुर्घटनेत जीवित हानी झालेली नाही. आमचे एस डी आर एफ पथक घटनास्थळी मदत कार्य करत आहेत असे उत्तराखंडचे डीजीपी अशोक कुमार यांनी सांगितले. हे वाचा - “कायद्याचे श्रेय घेणारे आज म्हणतायत फुलप्रूफ नव्हता, मराठा आरक्षणाचे खरे मारेकरी कोण?” फडणवीसांचा मुख्यमंत्र्यांवर पलटवार ढगफुटी पाऊस झाल्यामुळं शांता नदी पात्राबाहेर आल्यानं शांती बाजारमध्ये गदारोळ निर्माण झाला. देव प्रयागनगर पासून बसस्थानकापर्यंत जाणारा रस्ता पूर्णपणे पाण्याखाली गेला होता. हे वाचा - ‘माझ्या देशातील लोक मरत असताना मी कसा आनंद साजरा करू’, म्हणत प्रसिद्ध अभिनेत्रीनं थांबवलं लग्न मंगळवारी संध्याकाळी जवळपास चार वाजण्याच्या सुमारास दशरथ पहाड परिसरात ढगफुटीचा पाऊस झाला. त्यामुळे शांता नदीला पूर आला. विशेष म्हणजे आयटीआय भवनची तीन मजली इमारत या जलप्रलयामुळे जमीनदोस्त झाली. या भवन च्या खाली असणारे बँकेचे कार्यालय कम्प्युटर सेंटर फोटोशॉप इत्यादी दुकानेही जमीन दोस्त झाली. याशिवाय आजुबाजूच्या ज्वेलरी कापड मिठाई इत्यादी दुकानांमध्येही पाणी शिरले. शांती बाजार मध्ये या ढगफुटी पावसामुळे करोडोंचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. कोरोनामुळे संचार बंदी असल्याने रस्त्यावर कोणी नव्हते अन्यथा जीवितहानीही होण्याची शक्यता होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.